Sports legend Death : भारताच्या स्टार खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

Manuel Frederick death : भारताच्या स्टार खेळाडूचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरलीये.
Manuel Frederick News
Manuel Frederick death Saam tv
Published On
Summary

मॅन्युअल फ्रेडरिक हे केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील बारनासीरी भागातील खेळाडू होते.

त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला होता.

मॅन्यूएल यांनी १९७२ म्यूनिख ऑलिंपिकमध्ये भारतासाठी कांस्य पदकाची कामगिरी बजावली होती.

ते केरळमधून पदक जिंकणारे पहिले खेळाडू ठरले होते. 

Manuel Frederick Passes Away: हॉकी जगतातून एक दुखद वार्ता हाती आली आहे. १९७२ म्यूनिख ओलंपिकमध्ये भारताची मान उंचावणारे ब्रॉन्ज मेडलिस्ट मॅन्यूएल फ्रेडरिक यांचं निधन झालं आहे. मॅन्यूएल यांनी ३१ ऑक्टोबर रोजी शेवटचा श्वास घेतला. गेल्या १० महिन्यांपासून त्यांची प्रोस्टेट कॅन्सरशी झुंज देत होते. भारताचे स्टार खेळाडू मॅन्यूएल यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने भारतीय हॉकी जगतात शोककळा पसरली आहे.

Manuel Frederick News
Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

मॅन्यूएल फ्रेडरिक यांचा जन्म २० ऑक्टोबर १९४७ रोजी केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील बारनासीरीमध्ये जन्म झाला. फ्रेडरिक भारतासाठी कांस्य पद जिंकणारे केरळचे पहिले खेळाडू होते. त्यांच्यानंतर केरळमध्ये जन्माला आलेल्या पीआर श्रीराजेश यांनी टोकयो २०२० आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. भारतासाठी भरीव योगदान देणारे फ्रेडरिक यांना २०१९ साली क्रीडा मंत्रालयाने 'ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

Manuel Frederick News
Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 'मॅन्यएल फ्रेडरिक हे भारताचे चांगले गोलकीपर्सपैकी एक खेळाडू होते. भारतीय हॉकीसाठी त्यांनी चांगलं योगदान दिलं. त्यांच्या कामगिरीने अनेक खेळाडूंना प्रेरणा दिली. टीम हॉकी इंडियाकडून मी त्यांच्या कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त करतो. भारताने हॉकीचा महान खेळाडू गमावला आहे. त्यांच्या आठवणी सदैव राहतील, असे त्यांनी म्हटलं.

हॉकी इंडियाचे महासचिव भोला नाथ सिंह यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'त्यांचं निधन हॉकीच्या जगासाठी दुखद बाब आहे. मॅन्यूएल फ्रेडरिक यांनी मेहनत आणि समर्पण, केरळसारख्या गैर-पारंपरिक हॉकी राज्यात अनेक खेळाडूंना प्रेरणा दिली. त्यांनी केलेली देशसेवा नेहमी लक्षात राहील. आम्ही कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com