Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

solapur farmer’s daughter : सोलापुरातील एका शेतकऱ्याने काही महिन्यांपूर्वी आयुष्य संपवलं होतं. या शेतकऱ्याच्या मुलीची पोलीस होण्याची इच्छा होती. या मुलीच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस धावून आले आहेत.
solapur news
solapur farmer’s daughter Saam tv
Published On
Summary

शेतकरी शरद गंभीर यांची काही महिन्यांपूर्वी आर्थिक संकटामुळे आत्महत्या

त्यांची मुलगी श्वेता हिचं पोलीस होण्याचं स्वप्न

महाराष्ट्र पोलिसांनी दिली आर्थिक मदत

PSI बापूसाहेब शेळके आणि पोलीस विद्यार्थ्यांनी 65,500 रुपयांची आर्थिक मदत

महाराष्ट्र पोलीस दलाची एक सकारात्मक बातमी हाती आली आहे. शेतकरी बापाने आयुष्य संपवल्यानंतर पोलीस होण्याचं स्वप्न असणाऱ्या लेकीच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस धावून आले आहेत. वडिलांचा आधार गमावल्यानंतर आकाशात उंच भरारी घेण्यासाठी शेतकरी लेकीच्या मदतीसाठी पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणाऱ्या पोलीस विद्यार्थी धावून आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी सोलापूरसहित पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं. या भागातील शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. हातातोंडाशी आलेला घास पुराने हिसकावून घेतल्यानंतर शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं. या भागातील अनेक शेतकरी कर्जफेडीच्या संकटात सापडले. याच कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या 40 वर्षीय शरद गंभीर या शेतकऱ्याने आयुष्य संपवलं होतं. शरद गंभीर हे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कारी गावात राहायला होते.

solapur news
Bihar Elections : लाडक्या बहि‍णींना २५०० रुपये, मोफत वीज, सरकारी नोकरी; इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

पोलीस धावले मदतीला

वडील शरद गंभीर यांच्या मृत्यूनंतर मुलगी श्वेता हिने प्रसारमाध्यांना तिच्या कुटुंबाची मन हेलावून टाकणारी व्यथा सांगितली होती. बापाचा सर्वात मोठा आधार गमावलेल्या श्वेताने पोलीस होण्याचे स्वप्न असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. याच श्वेताच्या पोलीस होण्याच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी बापूसाहेब शेळके आणि त्यांच्या पोलीस विद्यार्थ्यांनी मोठी मदत केली आहे.

solapur news
Kalyan : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटात इनकमिंग सुरु; काँग्रेसच्या २ शिलेदारांचा शिवसेना प्रवेश

शेतकऱ्याच्या लेकीला दिली पोलिसांनी आर्थिक मदत

मुंबईच्या परळ येथील एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणारे पोलीस विद्यार्थ्यांच्या सहयोगातून संकटात सापडलेल्या श्वेता गंभीरला मोठी मदत केली. त्यांनी इयत्ता ८ वीत शिक्षण घेणाऱ्या श्वेताची भेट घेतली. त्यानंतर तिच्याकडे 65,500 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्त केली. आर्थिक संकटात सापडलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com