Bihar Elections : लाडक्या बहि‍णींना २५०० रुपये, मोफत वीज, सरकारी नोकरी; इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

Bihar Election update : इंडिया आघाडीकडून लाडक्या बहि‍णींना २५०० रुपयांना देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय लिहिलंय, जाणून घ्या.
Bihar Election news
Bihar Election Saam tv
Published On
Summary

बिहार निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचा ‘तेजस्वी प्रण’ जाहीरनामा जाहीर करण्यात आलाय

लाडक्या बहिणींना दरमहा ₹२५०० मदत

मोफत २०० युनिट वीजची घोषणा

सरकारी नोकरी कायदा आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने मंगळवारी जाहीरनामा जाहीर केला. इंडिया आघाडीने या जाहीरनाम्याला 'तेजस्वी प्रण'असं नाव दिलं आहे. इंडिया आघाडीने एका पत्रकार परिषदेत या जाहीरनाम्याची घोषणा केली. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा जाहीर केला. या जाहीरनाम्यातून २५ आश्वासने दिली आहेत. यात सरकारी नोकरी, पेन्शन, २०० युनिट मोफत वीज घोषणांचा समावेश आहे.

बिहारमध्ये तेजस्वी यादव हे इंडिया आघाडीचं नेतृत्व करत आहे. जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी झोकून देऊ, असा दावाही त्यांनी केला. बिहारमध्ये भाजपचे नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नितीश कुमार यांची बाहुल्यासारखी अवस्था केली आहे. भाजपने त्यांच्या चेहऱ्याचा वापर करून त्यांचा बाहुला केला आहे.

रोजगार आणि सरकारी नोकरी - इंडिया आघाडीने सत्तेत आल्यानंतर २० दिवसांच्या आत तरुणांना सरकारी नोकरी कायदा करण्यात येईल. त्यानंतर सरकारकडून २० महिन्यांच्या आत नोकऱ्या देण्यास सुरुवात केली जाईल.

कम्युनिटी मोबिलायजर्स(CM) दीदी : CM दीदींना कायमस्वरुपी केले जाईल. त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जाईल. त्यांना महिना ३०००० रुपये मानधन देण्यात येईल.

जीविका कॅडर भत्ता - जीविका कॅडरच्या बहिणींना इतर कार्यासाठी महिना २००० रुपयांचा भत्ता दिला जाईल.

कंत्राटी कामगारांना कायम करणे - सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी केले जाईल.

Bihar Election news
Tractor Morcha : कर्जमाफीसाठी नागपूरात 'ट्रॅक्टर मोर्चा'; शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक, VIDEO

जुनी पेन्शन योजना - जुनी पेन्शन योजना (OPS योजना) लागू केली जाईल.

लाडकी बहीण योजना - लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ डिसेंबरपासून दरमहा २५०० रुपये आणि पुढील ५ वर्षांसाठी ३०००० रुपये आर्थिक मदत दिली जाईल.

मोफत वीज - बिहारमधील प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज दिली जाईल.

Bihar Election news
Maharashtra Politics : काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

आरोग्य विमा - जन आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला २५ लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जाईल.

शिक्षण - इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत सर्व गरीब विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com