Sports legends retiring: मेस्सी, धोनी आणि...! 2026 मध्ये हे खेळाडू होणार निवृत्त

Surabhi Jayashree Jagdish

खेळाडूंची निवृ्त्ती

खेळ कोणताही असो एका ठराविक वेळेनंतर खेळाडू निवृत्ती घेतात. निवृत्तीची वेळ कधीही अचानक येत नाही. खेळाडू त्यासाठी काही काळ अगोदर विचार करून निर्णय घेतात.

कोणते खेळाडू होणार निवृत्त

काही खेळाडू असे आहेत ज्यांचा खेळ बदलेला नाही परंतु त्यांच्या आजूबाजूचं वातावरण बदललं आहे. २०२६ मध्ये जगातील असे कोणते खेळाडू आहेत जे निवृत्ती घेणार आहे ते पाहूयात.

नोवाक जोकेविच

सर्बियाचा दिग्गज टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच सध्या अग्रस्थानी आहे. मात्र आता टेनिसची कमान ही तरूण खेळाडूंच्या हाती जाताना दिसतेय. त्यामुळे या वर्षात जोकोविच रिटायर होण्याची शख्यता आहे.

लिओनेल मेस्सी

फुटबॉलच्या जगताचा किंग मानला जाणारा लिओनेल मेस्सीचा फिफा २०२६ चा वर्ल्डकप हा शेवटचा ठरू शकतो. मेस्सी अर्जेंटीनाकडून फुटबॉल खेळतो. २०२२ प्रमाणे यंदाही तो आपल्या टीमला वर्ल्डकप जिंकवून देऊन निवृ्त्ती घेण्याची शक्यता आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पहिल्यांदाच स्पष्ट केलं आहे की, यंदाचा वर्ल्डकप हा त्याच्यासाठी अखेरचा वर्ल्डकप आहे. रोनाल्डोच्या टीमने आतापर्यंत एकदाही वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलेलं नाही.

महेंद्रसिंग धोनी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यंदाच्या वेळी रिटायर होणार असल्याच्या चर्चा आहेत. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये अनेक तरूण खेळाडूंना स्थान देण्यात येतंय. त्यामुळे यावर्षी धोनीची निवृ्त्ती काहीशी पक्की मानली जातेय.

हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेटला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. ३६ वर्षाच्या हरमनप्रीतने नुकतंच टीम इंडियाला वनडे वर्ल्डकपही जिंकवून दिला. यंदाच्या वर्षी येणारा टी-२० वर्ल्डकप तिच्या इंटरनॅशनल क्रिकेटमधील शेवटचा अध्याय असू शकतो.

शाकिब अल हसन

बांगलादेशाचा माजी कर्णधार शाकिब अल हसन देखील यंदाच्या वर्षी निवृत्त होऊ शकतो. दीर्घकाळापासून त्याला टीममध्ये संधीही मिळत नाहीये. त्यामुळे शाकिब देखील निवृत्तीसारखा मोठा निर्णय घेऊ शकतो.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

peanut powder acidity
येथे क्लिक करा