

नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वशैलीला जागतिक स्तरावर मोठी पसंती
अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प या यादीत आठव्या क्रमांकावर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister) धडाडीचे निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. मग तो देशातील कोणता मुद्दा असो की आंतरराष्ट्रीय संकट. हे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के ट्रॅरिफ लावलाय. जेणेकरून भारत दबावात येईल आणि रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करेल. मात्र पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या दबावापुढे न जुमानता रशियाशी आपले व्यापारी संबंध सुरळीत चालू ठेवले. त्यांचा हा धडासी निर्णय आपल्याला माहितीये. त्यांच्या अशा धडाडीच्या निर्णयामुळे पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता दररोज वाढून लागलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात पहिल्या क्रमांकाचे नेते बनले आहेत. ताज्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग यादीत ते अव्वल स्थानावर आहेत.
तर महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) थेट आठव्या नंबर आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग यादी मॉर्निंग कन्सल्टने जारी केली आहे. ही यादी ६ ते १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. या यादीतील रेटिंग देशातील प्रौढांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातील गेल्या सात दिवसांच्या साध्या हालचाली सरासरीचे प्रतिबिंब आहे. या अहवालानुसार पंतप्रधान मोदींचे अप्रूवल रेटिंग ७१ टक्के आहे.
त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर जपानचे पंतप्रधान (Prime Minister) साने ताकाइची या आहेत. त्यांना सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांकडून ६३ टक्के अप्रूव्हल मिळाले आहे. त्यानंतर तिसऱ्यास्थानी दक्षिण कोरियाचे ली जे-म्युंग आहेत ज्यांना ५८ टक्के अप्रूव्हल मिळालंय. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ५८ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहेत.
अर्जेंटिनाचे जेवियर मेली पाचव्या स्थानावर आहेत. सर्वेक्षणात त्यांना ५८ टक्के मान्यता रेटिंग मिळालीय. कॅनडाचे मार्क कार्नी ४९ टक्के मान्यता रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंडचे करिन केलर-सटर ४४ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह सातव्या स्थानावर आहेत. या अप्रूव्हल रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ८ व्या क्रमांकावर आहेत, त्यांची अप्रूव्हल रेटिंग ४१ टक्के आहे. मेक्सिकोची क्लाउडिया शीनबॉम ४१ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह ९व्या क्रमांकावर आहे. ब्राझीलची लुला दा सिल्वा ३९ टक्के अप्रूव्हल रेटिंगसह १०व्या क्रमांकावर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.