Aishwarya Rai Speech: एकच धर्म आहे तो म्हणजे...पंतप्रधान मोदींसमोर ऐश्वर्या रायनं केलेल्या भाषणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Aishwarya Rai Speech: सत्य साई बाबांच्या शताब्दी महोत्सवी कार्यक्रमात ऐश्वर्या राय यांनी केलेलं भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन यांनी जात, धर्म आणि प्रेम यावर भावनिक भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पायांना स्पर्श करत त्यांचे दर्शन घेतले. त्याचा क व्हिडिओ देखील ट्रेंडिंगमध्ये आहे.
Aishwarya Rai Speech:
AISHWARYA RAI’S VIRAL SPEECH ON RELIGION & HUMANITY IN FRONT OF PM MODIsaamtv
Published On
Summary
  • पुट्टपर्ती येथील सत्य साई बाबा जन्मशताब्दी कार्यक्रमात केलं भाषण

  • पंतप्रधान मोदींसमोर ऐश्वर्या रॉय यांनी जात, धर्म आणि प्रेम यावर भाषण केलं.

  • भाषण करण्यापूर्वी ऐश्वर्या रॉय यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पाया पडत त्यांचे दर्शन घेतलं.

बॉलिवूडची (Bollywood) लोकप्रिया अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) पुन्हा एकदा चर्चेत आलीय. याआधी घटस्फोटाबाबतच्या अफवांमुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांचे नाव चर्चेत होते. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या राय यांचे नाव चर्चेत आहे, त्याचे कारण आहे, श्री. सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी समारंभात केलेल्या भाषणांमुळे.

Aishwarya Rai Speech:
Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

पुट्टपर्ती येथील श्री. सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी समारंभात ऐश्वर्या राय-बच्चन सहभागी झाल्या होत्या. येथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर जात, धर्म आणि प्रेम यावरून भाषण केलं. या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. भाषणाच्या आधीचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय, त्यात ऐश्वर्या राय पंतप्रधान मोदी यांच्या पाया पडताना दिसत आहे. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचं कौतुक करत आहेत.

Aishwarya Rai Speech:
Sheikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशी, बांग्लादेशमधील हिंसाचाराचा ठपका

ऐश्वर्या राय बच्चन यांनी या समारंभात जात आणि धर्म या विषयांवर लक्ष वेधणारे भाषण दिले. त्यांनी मानवता आणि प्रेमाचे महत्त्व सांगितले आणि सर्वांना विभाजनाच्या पलीकडे जाण्यास प्रोत्साहित केले. ऐश्वर्या रॉय यांनी सर्व पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये एकता आणि समजूतदारपणा वाढवण्यास सांगितलं. त्यांचे भाषणांना सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.

Aishwarya Rai Speech:
Aishwarya Rai: कान्स फिल्म फेस्टिवलमधील ऐश्वर्या राय बच्चनचे 7 ग्लॅमर्स लुक

" जगात फक्त एकच जात आहे, ती म्हणजे मानवतेची जात. फक्त एकच धर्म आहे, प्रेमाचा धर्म. फक्त एकच भाषा आहे, हृदयाची भाषा, आणि फक्त एकच देव आहे आणि तो सर्वव्यापी आहेत, असं त्या म्हणाल्या. भाषण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांनी ऐश्वर्या राय यांचे कौतुक करत भाषणाला टाळ्या वाजून दाद दिली. आपल्या भाषणात ऐश्वर्या राय यांनी श्री सत्य साई बाबा यांच्या शिकवणींबद्दल देखील सांगितले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत.

पंतप्रधान मोदी आज येथे आपल्यासोबत आहेत. या खास प्रसंगी सन्मान केल्याबद्दल ऐश्वर्या रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानलेत. तुमचे भाषण आम्हाला मंत्रमुग्ध करतात. तुमचे ज्ञानी शब्द, नेहमीप्रमाणेच प्रभावी आणि प्रेरणादायी असतात ते ऐकण्यास मी उत्सुक असल्याचंही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com