Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : ऐश्वर्या रायसोबत बेक्रअपनंतर सलमान खानला मोठा धक्का बसला होता. तो 'तेरे नाम' गाणे ऐकून खूप रडायचा. नेमका किस्सा काय, जाणून घेऊयात.
Aishwarya Rai-Salman Khan Breakup
Salman KhanSAAM TV
Published On
Summary

हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे रिलेशनशिप सुरू झाले.

ऐश्वर्या राय आणि सलमान खानचा 2002 मध्ये ब्रेकअप झाला.

ऐश्वर्या रायसोबत बेक्रअपनंतर सलमान खान 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा.

सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) यांचे नाते कायम चर्चेचा विषय असतो. सलमान आणि ऐश्वर्याने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे रिलेशनशिप सुरू झाले. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट 1999 मध्ये रिलीज झाला. 2002 मध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खानचा ब्रेकअप झाला.

ब्रेकअपनंतर सलमान खानने 2003 मध्ये 'तेरे नाम' (Tere Naam ) चित्रपट केला. ज्यात तो मुख्य भूमिकेत झळकला होता. गीतकार समीर अंजान याने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सलमान खानबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमभंग झाल्याचा प्रभाव 'तेरे नाम' करताना सलमान खानच्या अभिनयात दिसून येत होता. सलमान 'तेरे नाम' गाणे ऐकून खूप अस्वस्थ व्हायचा.

समीर अंजान यांनी शुभंकर मिश्राला यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "'तेरे नाम' हे गाणे सलमान खानसाठी लिहिण्यात आले नव्हते. गाणं रिलीज झाल्यावर ते सलमान खानच्या ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअप असल्याचे सर्वांना वाटू लागले. सलमान खान हिमेश रेशमियाला फोन करून त्याला गाणं गायला सांगायचा आणि खूप रडायचा. सलमान खानला ब्रेकअपमुळे खूप त्रास झाला. सेटवर, शॉट देण्यापूर्वी हिमेश 'तेरे नाम' गाणं गायचा आणि सलमान खान रडायचा.

पुढे समीर अंजानने म्हणाले क, 'तेरे नाम' गाण्यातील 'क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती' ही ओळ सलमानला ऐश्वर्यापर्यंत पोहोचवायची होती. जेणेकरून तिला त्याचे दुःख कळेल. " 2007मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. सलमान खान आणि ऐश्वर्या राय आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले.

Aishwarya Rai-Salman Khan Breakup
Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने मुंबईत खरेदी केले लग्जरी ऑफिस, कोटींमध्ये आहे किंमत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com