Sakshi Sunil Jadhav
महिलांना साडी घालण्याची विशेष आवड असते. विशेषतः बनारसी आणि सिल्क साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात आणि सण-समारंभ, लग्न किंवा खास कार्यक्रमांमध्ये या साड्या परिधान केल्या जातात.
साडीवर डाग पडल्यास तो लगेच काढण्याचा प्रयत्न करा. उशीर केल्यास डाग हटवणे कठीण होते.
डाग पडलेल्या ठिकाणी थोडे मीठ आणि लिंबाचा रस लावा. नंतर मऊ कापडाने हलके स्क्रब केल्यास डाग हलका होण्यास मदत होते.
साडी धुताना कडक डिटर्जेंट वापरू नका. हलक्या प्रकारचे लिक्विड डिटर्जेंट किंवा हेअर शॅम्पू वापरणे सुरक्षित ठरते.
एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात डिटर्जेंट किंवा शॅम्पू मिसळा. त्यात साडी हलक्या हाताने 10-15 मिनिटे भिजत ठेवा.
सिल्क आणि बनारसी साडी नाजूक असते. त्यामुळे ती जोरात घासू किंवा दाबू नका, अन्यथा कापड खराब होऊ शकते.
भिजवल्यानंतर साडी स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवा. डिटर्जेंट पूर्णपणे निघेपर्यंत पाणी बदलत राहा.
धुतल्यानंतर साडी जोरात पिळू नका. त्यामुळे साडीचा आकार आणि कापड खराब होऊ शकते.
सिल्क आणि बनारसी साडी थेट उन्हात वाळवू नका. ती नेहमी सावलीत वाऱ्याच्या ठिकाणी सुकवावी.