Rava Kesari Recipe: गुढीपाडव्याला पाहुणे येणार असतील तर नक्की बनवा रवा केसरी, आत्ताच नोट करा पांरपारिक रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

गुढीपाडव्याची सुरुवात

गुढीपाडव्याच्या सणाला गोड पदार्थ बनवण्याची परंपरा असते. अशावेळी झटपट आणि चविष्ट बनणारा रवा केसरी हा खास दक्षिण भारतीय गोड पदार्थ अनेकांच्या घरी बनवला जातो. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी सणाच्या आनंदात आणखी गोडवा वाढवते.

साहित्य

रवा 1 कप, साखर 1 कप, तूप 3 ते 4 चमचे, पाणी 2 कप, केशर किंवा फूड कलर चिमूटभर. काजू 8 ते 10, मनुका 10 ते 12, वेलची पूड ½ चमचा इ.

Rava Kesari Recipe

स्टेप १

सर्वप्रथम कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये काजू आणि मनुके हलके सोनेरी होईपर्यंत परतून बाजूला काढून ठेवा.

Rava Kesari Recipe

स्टेप २

त्याच कढईत रवा घालून मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे छान भाजून घ्या. रव्याचा हलका सुगंध येईपर्यंत भाजत राहा.

Rava Kesari Recipe

स्टेप ३

एका भांड्यात 2 कप पाणी गरम करून त्यामध्ये केशर किंवा फूड कलर घालून उकळी आणा. आता भाजलेल्या रव्यामध्ये हळूहळू गरम पाणी घाला आणि सतत हलवत रहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.

Rava Kesari Recipe

स्टेप ४

रवा पाणी शोषून थोडा घट्ट झाल्यावर त्यामध्ये साखर घाला आणि व्यवस्थित मिसळा. साखर घातल्यानंतर मिश्रण पुन्हा थोडे पातळ होईल, त्यामुळे ते मध्यम आचेवर सतत हलवत शिजवा.

Rava Kesari Recipe

स्टेप ५

आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घाला आणि मिश्रण चांगले मऊ होईपर्यंत ढवळत रहा. त्यानंतर वेलची पूड आणि परतलेले काजू-मनुका घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

Rava Kesari Recipe

स्टेप ६

शेवटी मिश्रण घट्ट होऊन कढई सोडू लागले की गॅस बंद करा. गरमागरम रवा केसरी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Gudi Padwa sweet recipe

NEXT: Lapwing Bird: टिटव्या स्वप्नात ओरडताना दिसणं शुभ की अशुभ? जाणून घ्या सत्य

dream meaning titvi bird | google
येथे क्लिक करा