PM Narendra Modi Congratulates Om Birla Saam Tv
देश विदेश

PM Modi On Om Birla: ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

PM Narendra Modi Congratulates Om Birla: लोकसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर ओम बिर्ला यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

Priya More

भाजप खासदार ओम बिर्ला (OM Birla) यांची बुधवारी 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाच्या के सुरेश यांचा पराभव केला. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. लोकसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर ओम बिर्ला यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 'मला सभागृहाच्या वतीने तुमचे अभिनंदन करायचे आहे. या अमृत ​काळामध्ये दुसऱ्यांदा हे पद मिळविणे ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की येत्या ५ वर्षांत आम्हाला मार्गदर्शन कराल आणि देशाची आशा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत कराल.'

पीएम मोदींनी आपल्या भाषणावेळी सांगितले की, 'हे सदनचे सौभाग्य आहे की तुम्ही दुसऱ्यांना या आसनावर विराजमान झाले आहेत. तुम्हाला आणि पूर्ण सदनाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत पण या सदनाकडूनही तुम्हाला शुभेच्छा. अमृतकाळातील या महत्वपूर्ण कालखंडात दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होणं खूप मोठं आहे. तुमचा ५ वर्षांचा अनुभव आणि तुमच्यासोबत आमचा देखील ५ वर्षांचा अनुभव आहे. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही येत्या ५ वर्षांत आम्हाला मार्गदर्शन कराल आणि देशाची आशा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सदन आपले दायीत्व पूर्ण करण्यासाठी तुमची मोठी भूमिका राहिल.'

पीएम मोदींनी पुढे सांगितले की, 'विनम्र आणि व्यवहार कुशल व्यक्ती सहजरित्या यशस्वी होतो. तुम्हाला खूप गोड स्माईल मिळाली आहे. तुमच्या चेहऱ्यावरील ही गोड स्माइल पूर्ण सदनाला प्रसन्न ठेवते. मला विश्वास आहे की तुम्ही प्रत्येक पावलावर नवीन किर्तीमान करत आहेत. १८ व्या लोकसभेमध्ये स्पीकरचा कारभार दुसऱ्यांदा सांभाळणे हे आपल्या आपल्यामध्ये नवीन रेकॉर्ड बनताना बघत आहोत. श्री. बलराम जाफर हे लोकसभेचे पहिले असे अध्यक्ष होते ज्यांनी ५ वर्षे कार्यकाळ पूर्ण करून त्यांना पुन्हा स्पीकर बनण्याचा अधिकार मिळाला होता. त्यानंतर तुम्ही आहात ज्यांना ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या पदावर बसण्याची संधी मिळाली. स्पीकरचे काम खूप कठीण आहे. त्यासाठी पुन्हा जिंकणे कठीण असते. पण तुम्ही पुन्हा जिंकून आल्याने नवीन इतिहास रचला आहे.'

तसंच, 'मी एक खासदार म्हणून सांगतो की तुम्ही ज्याप्रकारे एका खासदाराप्रमाणे काम करता हे जाणून घेण्यासारखे आणि शिकण्यासारखी आहे. मला विश्वास आहे की तुमची कार्यशैली आमच्या युवा खासदारांना प्रेरणा देईल. तुम्ही खूप चांगले काम केले आहे ते खूप प्रेरणादायी आहे. तुम्ही कोटाच्या ग्रामीण क्षेत्रात हॉस्पिटल आणि मिल्स हे देखील एक मानव सेवेचे उत्तम काम केले आहे. राजकीय कामाव्यतिरिक्त कामं देखील तुम्ही केली. तुम्ही नियमितपणे लोकांना कपडे, चादर, छत्री, बुटं अशी अनेक सुविधा दिली आहेत. खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम तुम्ही केले. तुमच्या मागच्या कार्यकाळामध्ये संसदीय इतिहासातील तो स्मरणीय कालखंड राहिला आहे. तुमच्या अध्यक्षतेखाली सदनच्या माध्यमातून सुधारणा झाली आहे. भारताच्या भविष्याला नवी दिशा देण्यामध्ये तुमच्या अध्यक्षवाल्या १७ व्या लोकसभेची महत्वाची भूमिका राहिली आहे. १७ व्या लोकसभेत अनेक विधेयक आणि कायदे तुमच्या अध्यक्षतेखाली पारित करण्यात आले आहे. जे कार्य स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत झाले नाही ते तुमच्या अध्यक्षतेखालील या सदनाने करून दाखवले.', असे पीएम मोदींनी सांगितले.

पीएम मोदींनी ओम बिर्ला यांचे कौतुक केले आहे. त्यांनी सांगितले की, 'हे आपले भवन फक्त चार भिंतींचे नाही. आपले हे संसद १४० कोटी देशवासियांच्या आशेचे केंद्र आहे. तुमचे विशेष अभिनंद केले पाहिजे. कोरोनासारख्या कठीण काळात प्रत्येक खासदारांशी तुम्ही फोवरून चर्चा केली. तुम्ही व्यक्तीगत रित्या त्यांची चिंता केली आणि विचारपूसही केली. मला याबद्दल खूप अभिमान वाटतो. कोरोना काळात तुम्ही सदनचे काम थांबू दिले नाही. तुमच्यामुळे आम्ही कठीण काळात कार्य करू शकलो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT