Who is Om Birla? दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष झाले तर होईल इतिहास, जाणून घ्या राजकीय प्रवास

Om Birla Political Journey: देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होतेय. माजी सभापती आणि कोटाचे खासदार ओम बिर्ला हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार आहेत.
Who is Om Birla? दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष झाले तर होईल इतिहास, जाणून घ्या राजकीय प्रवास
Om Birla Political Journey

लोकसभेत आज सभापतीपदासाठी निवडणूक होतेय. राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप खासदार ओम बिर्ला यांना एनडीएने अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलीय. जर ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभेचे अध्यक्ष झाले तर ते एक इतिहास रचतील. त्याच कारण म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याच अध्यक्षाने दोन टर्म लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलं नाहीये.

१७ व्या लोकसभेत ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. यानंतर आता १८व्या लोकसभेतही एनडीएमध्ये त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. त्यांनी उमेदवारीही दाखल केलीय. एनडीएच्या संख्याबळानुसार ओम बिर्ला यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. म्हणजेच त्यांचा लोकसभा अध्यक्ष होणं जवळपास निश्चित आहे.

ओम बिर्ला यांचा संसदीय अनुभव फार नसला तरी ते 2003 पासून ते सातत्याने प्रत्येक निवडणूक जिंकत आहे. 2003 मध्ये त्यांनी कोटामधून पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 2008 मध्ये त्यांनी कोटा दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या शांती धारिवाल यांचा पराभव करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. 2013 मध्ये कोटा दक्षिणमधून त्यांनी तिसरी विधानसभा निवडणूकही जिंकली होती.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ओम बिर्ला यांना कोटा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. ही निवडणूक जिंकल्यानंतर बिर्ला यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 2019 मध्ये बिर्ला पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर भाजपने त्यांना सभापती करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. बिर्ला यांना प्रदीर्घ संसदीय अनुभव नसला तरी त्यांनी ज्या पद्धतीने लोकसभा चालवली त्याचे सर्वांनी कौतुक केलय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com