Lok Sabha Speaker Election: कोण आहेत खासदार के. सुरेश? जे लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांना देणार आव्हान

Who is K. Suresh: आज लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी मतनदान होणार आहे. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आगाडीकडून के सुरेश हे अध्यक्षसंपदाचे उमेदवार आहेत. यातच के सुरेश हे कोण आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
कोण आहेत खासदार के. सुरेश? जे लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांना देणार आव्हान
Who is K. Suresh?saam tv
Published On

लोकसभा अध्यक्षांबाबत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधकांमध्ये एकमत झालेलं नाही. दोन्ही आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजप खासदार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीमधून काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी मंगळवारी लोकसभा सरचिटणीस कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला केले.

यासाठी आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर होईल. यातच इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे कोडीकुन्निल सुरेश कोण आहेत, हे जाणून घेऊ...

कोण आहेत खासदार के. सुरेश? जे लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांना देणार आव्हान
Maharashtra Politics: काँग्रेस ठोकणार विधानसभेच्या थेट ८४ जागांवर दावा, दिल्लीच्या बैठकीत काय झाली चर्चा? वाचा...

स्वातंत्र्यानंतर देशात तिसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. सत्ताधारी एनडीए विरोधी पक्षाला उपसभापतीपद देण्याची परंपरा पाळत नसल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. यातच काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल आणि डीएमके नेते टीआर बालू यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यात एनडीएकडून विरोधी पक्षांना उपसभापतीपद देण्याचं आश्वासन मिळत नसल्याने इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्यास नकार दिला आहे.

कोण आहेत के. सुरेश?

के सुरेश यांच्या समर्थनार्थ इंडिया आघाडीने मंगळवारी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. के सुरेश हे दलित नेते असून ते आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. केरळच्या मावेलिकारा लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक जिंकत आहेत. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली.

कोण आहेत खासदार के. सुरेश? जे लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांना देणार आव्हान
Maharashtra Politics: काँग्रेस ठोकणार विधानसभेच्या थेट ८४ जागांवर दावा, दिल्लीच्या बैठकीत काय झाली चर्चा? वाचा...

के सुरेश 2009 मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री राहिले आहेत. 2012 ते 2014 पर्यंत ते राज्यमंत्री होते. 2018 मध्ये त्यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांना केरळ काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बनवण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com