Lok Sabha Speaker Elections: लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचा ३ ओळींचा व्हीप, खासदारांना नेमकी काय सूचना?

Congress Gave 3 Line Whip To Member of Parliament: संसदेचे अधिवेशन सुरू झाले असून लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या म्हणजेच 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेसने लोकसभेतील आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.
लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचा ३ ओळींचा व्हीप, खासदारांना नेमकी काय सूचना?
Congress NewsSaam TV
Published On

मोदी सरकार ३.० च्या पहिल्याच संसद अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. यातच लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या म्हणजेच 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी काँग्रेसने लोकसभेतील आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.

उद्या लोकसभेत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे काँग्रेस संसदीय पक्षाने खासदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. उद्या सभागृहात पक्षातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रात काँग्रेसने खासदारांना उपस्थित राहण्यासाठी वेळही सांगितली आहे. सकाळी ११ ते सभागृह तहकूब होईपर्यंत सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असं या पत्रात लिहिलं आहे.

लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचा ३ ओळींचा व्हीप, खासदारांना नेमकी काय सूचना?
Cm Eknath Shinde: खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यावर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला निर्देश

दरम्यान, लोकसभा अध्यक्षांची निवडणूक विनविरोध व्हावी म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी उपसभापतीपद देण्याची मागणी सत्तेतील एनडीए सरकारला केली आहे. तसेच उपसभापतीपद विरोधकांना देण्यात येईल, अशी ग्वाही भाजपने द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र भाजपने यावर अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर आता इंडिया आघाडीच्या के. सुरेश यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला.

लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचा ३ ओळींचा व्हीप, खासदारांना नेमकी काय सूचना?
Manoj Jarange Video: 'मराठा-ओबीसींमधील सलोखा बिघडू देऊ नका', मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन

दरम्यान, दिल्लीत आज काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यात महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींनी यावेळी काँग्रेस नेत्यांना सूचना दिल्या की, आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला लढायची आहे. निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन जाता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली. तसेच जाहीरनामामध्ये कोणते मुद्दे घेता येतील, यावरही बैठकीत चर्चा झाली.

आज रात्री इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. रात्री ८ वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून यात लोकसभा निवडणुकीचे मंथन करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com