PM Modi in Nashik : 'शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील; पीएम मोदींनी ठाकरे गटाला डिवचलं

Pm Narendra modi speech in nashik : 'शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ठाकरे गटाला डिवचलं.
PM Narendra Modi Nashik Sabha
PM Narendra Modi Nashik Sabha Saam tv

नाशिक : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचारसंभाचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची नाशिकमध्ये जंगी प्रचारसभा होत आहे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील महायुतीच्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ठाकरे गटाला डिवचलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील भाषणाचे मुद्दे

काल काशीमध्ये बाबा विश्वनाथ आणि कालभैरव यांना नमन करत उमेदवारी अर्ज भरला. आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना प्रणाम करतो. तुमची सेवा करणे हेच माझ्या जीवनाचं लक्ष्य आहे.

तुम्ही मागील १० वर्षातील काम पाहिलं आहे. आता तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो आहे. तिसऱ्या कार्यकाळासाठी आशीर्वाद घ्यायला आलो आहे.

आता एनडीएला मोठा विजय मिळणार आहे. याची प्रचिती इंडिया आघाडीच्या एका नेत्याच्या वक्तव्यामुळे येते.

PM Narendra Modi Nashik Sabha
PM Modi Roadshow in Ghatkopar: PM मोदींचा मुंबईत रोड शो, ड्रोन- पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी

इंडिया आघाडीतील काँग्रेस हरू लागली आहे. आता त्यांना विरोधी पक्ष होणेही अवघड झालं आहे.

यामुळे इंडिया आघाडीचे महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने त्यांनी सर्व छोट्या पक्षांना सल्ला दिला आहे की, निवडणूक झाल्यानंतर सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे. त्यांना वाटतं की, सर्व दुकाने एकत्र झाली तर देशात काँग्रेस विरोधी पक्ष होईल.

नकली शिवसेना आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलीन होणे निश्चित आहे. नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण येईल.

बाळासाहेब म्हणायचे की, जेव्हा शिवसेना काँग्रेस होईल, तेव्हा शिवसेना संपवेल. त्यामुळे आता शिवसेना नामशेष होईल. जो विनाश होत आहे, ते पाहून बाळासाहेबांना मोठं दु:ख होत असेल.

PM Narendra Modi Nashik Sabha
Video: लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

बाळासाहेबांचं स्वप्न होतं की, अयोध्येत राम मंदिर व्हावं. जम्मू-कश्मीरमधून ३७० कलम रद्द होवो. मात्र, यामुळे नकली शिवसेनेला अधिक राग येत आहे. काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला धुडकावलं. नकली शिवसेनेही तोच मार्ग स्वीकारला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com