Rahul Gandhi: लोकसभेचे अध्यक्षासाठी 'इंडिया' आघाडीचा पाठिंबा, पण...; राहुल गांधींनी ठेवली एक अट

Rahul Gandhi: लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात राहुल गांधी आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसभा अध्यक्षासांठी इंडिया आघाडीचा पाठिंबा असेल पण एनडीए आणि पंतप्रधान मोदींनी आमची अट मान्य करावी, असं राहुल गांधी म्हणाले.
Rahul Gandhi:लोकसभेचे अध्यक्षासाठी  'इंडिया' आघाडीचा पाठिंबा, पण...; राहुल गांधींनी ठेवली एक अट
Rahul Gandhi

आज एनडीएकडून ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसनेही या पदासाठी आपला उमेदवार उतरवलाय. के. सुरेश यांना उमेदवारी देण्यात आलीय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. याआधी राजनाथ यांनी काँग्रेस अध्यक्षांना फोन करून अध्यक्षांसाठी पाठिंबा मागितला होता, त्यावर राहुल गांधी यांनी मत मांडलय.

विरोधी पक्ष अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं म्हटलं. त्याचवेळी राहुल गांधींनी एनडीएसमोर अट ठेवलीय. लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी एकमत घडवण्यासाठी सरकारच्या वतीने ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधत त्यांचा पाठिंबा मागितला. त्यावर आज राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले , "आम्ही राजनाथ सिंह यांना सांगितलं की, आम्ही त्यांच्या अध्यक्ष (उमेदवार)ला पाठिंबा देऊ, पण परंपरा अशी आहे की उपाध्यक्षपद विरोधकांना दिले पाहिजं."

राजनाथ सिंह आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील देखील चर्चा झाल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. दोन्ही नेत्यांच्या संभाषणाचा खुलासा देतांना राहुल गांधी म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांचा ‘अपमान’ केला जातोय. पण वृत्तपत्रात असं म्हटलं जातं की, विरोधकांनी सरकारला रचनात्मक सहकार्य करावं, पंतप्रधान मोदी म्हणतात.

राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करून अध्यक्षांना पाठिंबा देण्यास सांगितले. त्यावर राहुल गांधी म्हणाले, आम्ही अध्यक्षांना पाठिंबा देण्यास तयार पण, उपध्यक्षपद विरोधकांना द्यावे, अशी परंपरा आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना परत संपर्क करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितले, मात्र त्यांनी अद्याप तसे केलेले नाही. पंतप्रधान मोदी विरोधकांकडून सहकार्य मागत आहेत, पण आमच्या नेत्याचा अपमान केला जातोय, असं राहुल गांधी म्हणाले.

लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक २६ जून म्हणजेच उद्या होणार आहे. तर २७ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. विरोधी पक्षाने अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार घोषित केलाय. कनिष्ठ सभागृहाच्या सभापतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.

Rahul Gandhi:लोकसभेचे अध्यक्षासाठी  'इंडिया' आघाडीचा पाठिंबा, पण...; राहुल गांधींनी ठेवली एक अट
Lok Sabha Speaker: इतिहासात पहिल्यांदा लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक, उमेदवार कोण असणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com