देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यातच सगळ्याच राजकीय पक्षांकडू उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येत आहे. मात्र अद्याप प्रमुख राजकीय पक्ष भाजप आणि काँग्रेसने आपला लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला नाही.
यातच भारतीय जनता पक्षाने आज जाहीरनामा समिती जाहीर केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. या समितीत आणखी कोणत्या नेत्यांचा समावेश आहे, हे जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली. या समितीचे काम जाहीरनामा तयार करण्याचे आहे. ज्यामध्ये एकूण 27 सदस्यांची नावे आहेत. या समितीचे अध्यक्ष राजस्थान सिंह असतील, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना संयोजक बनवण्यात आले आहे. तसेच पियुष गोयल यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
राजनाथ सिंह: उत्तर प्रदेश: अध्यक्ष
निर्मला सीतारामन: तामिळनाडू: संयोजक
पियुष गोयल : महाराष्ट्र : सहसंयोजक
अर्जुन मुंडा: झारखंड: सदस्य
भूपेंद्र यादव : राजस्थान : सदस्य
अर्जुनराम मेघवाल : राजस्थान : सदस्य
किरेन रिजिजू: अरुणाचल प्रदेश: सदस्य
अश्विनी वैष्णव: ओडिशा: सदस्य
धर्मेंद्र प्रधान: ओडिशा: सदस्य
भूपेंद्र पटेल : गुजरात : सदस्य
हिमंता विश्वसरमा: आसाम: सदस्य
विष्णुदेव साई: छत्तीसगड: सदस्य
डॉ. मोहन यादव: मध्य प्रदेश: सदस्य
शिवराज सिंह चौहान: मध्य प्रदेश: सदस्य
वसुंधरा राजे : राजस्थान : सदस्य
स्मृती इराणी : उत्तर प्रदेश : सदस्य
जुआल ओरम: ओडिशा: सदस्य
रविशंकर प्रसाद: बिहार: सदस्य
सुशील मोदी: बिहार: सदस्य
केशव प्रसाद मौर्य : उत्तर प्रदेश : सदस्य
राजीव चंद्रशेखर: कर्नाटक: सदस्य
विनोद तावडे : महाराष्ट्र : सदस्य
राधामोहन दास अग्रवाल: उत्तर प्रदेश: सदस्य
मनजिंदर सिंग सिरसा : दिल्ली : सदस्य
ओपी धनखर: हरियाणा: सदस्य
अनिल अँटनी: केरळ: सदस्य
तारिक मन्सूर: उत्तर प्रदेश: सदस्य
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.