18th Loksabha Parliament Session Live Updates:
18th Loksabha Parliament Session Live Updates: Saamtv

PM Narendra Modi Video: 'संसदेत वाद- प्रतिवाद हवा, गोंधळ अन् नाटक नको', अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदी विरोधकांवर बरसले!

18th Loksabha Parliament Session Live Updates: संसदीय कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस गौरवशाली असल्याचे म्हणत नवीन खासदारांना शुभेच्छा दिल्या.
Published on

दिल्ली, ता. २४ जून २०२४

आजपासून १८ व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. संसदीय कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस गौरवशाली असल्याचे म्हणत नवीन खासदारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधत थेट इशारा दिला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"आज संसदीय लोकशाहीसाठी गौरवाचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नवीन संसदेत शपथविधी होत आहे. या भव्यदिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. २०२७ पर्यंत एक उत्तम भारत घडवण्याच्या उद्देशाने काम करुया," असे म्हणत पंतप्रधान मोदींनी नव्या खासदारांना शुभेच्छा दिल्या.

विरोधकांवर निशाणा

"सर्व खासदारांकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत. देशाला चांगल्या, जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. देशातील जनतेला विरोधकांकडून चांगल्या कामांची अपेक्षा आहे. लोकशाहीची प्रतिष्ठा राखण्याची अपेक्षा आहे. जनतेला वाद- प्रतिवाद हवा आहे. त्यांना नाटक, गोंधळ नको आहे. जनतेला खात्री पाहिजे, फक्त घोषणा नको," असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना इशारा दिला.

18th Loksabha Parliament Session Live Updates:
Sanjay Raut Video: 'मोदी- शहांचा आवाज चालणार नाही, २४० चे २७५ कधी होतील कळणारही नाही', संजय राऊत गरजले!

संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांचा पहिला मोठा विरोध पाहायला मिळाला. आज विरोधी पक्षाच्या तीनही खासदारांनी प्रोटेम स्पीकर पॅनेलवर बहिष्कार टाकला. काँग्रेस खासदार के सुरेश, TMC चे सुदीप बंदोपाध्याय आणि DMK चे टीआर बालू यांनी प्रोटेम स्पीकर पदाच्या पॅनलची शपथ घेण्यास नकार दिला.

तीनही सदस्यांचे नाव पुकारले तरी हे सदस्य शपथ घ्यायला गेले नाहीत. सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या के सुरेश यांना प्रोटेम स्पीकर नियुक्त करावं अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र ती फेटाळून लावल्याने विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com