केंद्रीय मंत्री परिषदेची आज बैठक (Cabinet Ministers Meeting) होणार आहे. या बैठकीत शासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. प्रमुख धोरण आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान वेळोवेळी मंत्री परिषदेच्या बैठका घेत आहेत. केंद्रीय मंत्री परिषदेची ही बैठक आज दिवसभर सुरू राहणार आहे. (latest politics news)
लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) केंद्र सरकार पूर्ण कृतीत आहे. दिल्लीतील सुषमा स्वराज भवनात आज केंद्रीय मंत्री परिषदेची बैठक होणार आहे. दिवसभर चालणारी ही बैठक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची मंत्रीपरिषदेची शेवटची बैठक असेल. या बैठकीत २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा रोडमॅप आणि व्हिजनवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत व्हिजन इंडिया-२०४७ चे सादरीकरणही करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी असणार आहेत. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत सर्व मंत्रालयांचे सचिवही उपस्थित राहणार आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान मोदींची आज मंत्र्यांसोबत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) वेळोवेळी मंत्रिपरिषदेच्या बैठका घेऊन प्रमुख धोरण आणि प्रशासनाशी संबंधित विषयांवर चर्चा करत आहेत, परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या महत्त्वाच्या बैठकीत पीएम मोदी लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा मंत्रही देणार असल्याचं सांगितलं जातंय. याआधी एका बैठकीत पंतप्रधान मोदींनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या संबंधित मंत्रालयांच्या पुढील १०० दिवसांचा रोडमॅप तयार करण्यास सांगितलं होतं.
पीएम मोदींनी एनडीए आघाडीसाठी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यापैकी एकट्या भाजपने ३७० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पीएम मोदींनी ( PM Narendra Modi Meeting) पक्षाला आपली योजना सांगितली होती.लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयासाठी १०० दिवसांचा आराखडाही तयार केला होता. आजची मंत्रीपरिषदेची बैठक केंद्र सरकार आणि भाजपसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचं मानलं जात आहे. केंद्रीय मंत्री परिषदेची ही बैठक आज दिवसभर सुरू राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी
काल भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार (PM Modi Cabinet Ministers Meeting) आहेत.
उमेदवारांच्या पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. उमेदवारांच्या यादीत महिला आणि तरुणांव्यतिरिक्त सर्व जाती आणि समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचा पक्षाचा दावा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.