Maratha Reservation: लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे राहणार, मराठा समाजाच्या बैठकीत मोठा निर्णय
Maratha Reservation:
ओबीसींमधून आरक्षण मिळावं आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करावी यासाठी आता मराठा आंदोलकांनी वेगळाच पावित्रा घेतलाय. येत्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे राहिल्यास निवडणूक घेण्याचे आव्हानच प्रशासना समोर राहणार आहे. याबरोबरच या बैठकीत इतरही ठराव घेण्यात आले असून याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार देखील मराठा समाज बांधवांनी केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघात २५० मराठा उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात
यातच मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी होणार आहे. राज्य सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत. यावरच आता नाराज मराठा समाजाच्या आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 250 हून अधिक उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
फडणवीसांवर जरांगे यांची पुन्हा टीका
दरम्यान, उपचारांनंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस स्वत:ला न्यायालयापेक्षाही मोठं समजतात. मात्र फडणवीस साहेब चुकीच्या जागेवर भेटले आहेत. मी तर अटक करायची वाटच पाहतोय. तुम्ही माझी एसआयटी चौकशी करता आणि घोटाळे करणारे तुमच्या मागे सुंगधी अगरबत्ती प्रमाणे फिरत आहेत.''
ते म्हणाले होते की, ''अजूनही फडणवीसांनी शहाणपणाची भूमिका घ्यावी. मोदी आणि शाह यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. माझ्या चौकशीची मी वाट पाहत आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.