BJP Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची नावे आज करणार जाहीर? पहिल्या यादीत कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (BJP) शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते.
Pm Narendra Modi and Amit Shah
Pm Narendra Modi and Amit ShahSaam Tv
Published On

BJP Candidate 1st List:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (BJP) शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली यादी आज संध्याकाळी 6 वाजता येऊ शकते, अशी माहिती आहे. नुकतीच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची मॅरेथॉन बैठक झाली. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा यांच्यासह दिग्गज नेते सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा काही दिवसांनी जाहीर होऊ शकतात. सध्या मुख्य निवडणूक आयुक्त विविध राज्यांना भेटी देऊन तेथील तयारीचा आढावा घेत आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आदी ठिकाणी दौरे झाले असून सर्व राज्यांचे दौरे पूर्ण झाल्यानंतर तारखा जाहीर केल्या जातील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pm Narendra Modi and Amit Shah
Maratha Reservation: लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे राहणार, मराठा समाजाच्या बैठकीत मोठा निर्णय

गुरुवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रात्री साडेतीनपर्यंत सुरू होती. यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी निश्चित करण्यासाठी चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मोहन यादव यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाग घेतला.  (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत उत्तर प्रदेशातील सुमारे 50 जागांसाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. यापैकी निम्म्या जागांसाठी उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात.

Pm Narendra Modi and Amit Shah
Himachal Weather: हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, बर्फवृष्टीमुळे 350 रस्ते बंद; शाळा-महाविद्यालयांना सुटी

उत्तर प्रदेशात भाजप अपना दलला (एस) दोन जागा, जयंत चौधरी यांच्या आरएलडीला दोन जागा, ओम प्रकाश राजभर यांच्या पक्षाला एक जागा आणि संजय निषाद यांच्या पक्षाला एक जागा देऊ शकते. उर्वरित जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करू शकते. दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं नावं निश्चत मानलं जात आहे. मात्र इतर उमेदवारांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com