पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथे आयोजित रॅलीनंतर जनसमुहाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तुम्ही -आम्ही आणि भ्रष्टाचारच भ्रष्टाचार, असा टीएमसीचा फूल फॉर्म सांगत त्यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर मोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. टीएमसीच्या भ्रष्टाचारामुळे बंगालची प्रतिमा डागाळली आहे. प्रत्येक योजनेत त्यांचा घोटाळा सुरू आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजना आपल्या नावावर खपवतात. गरिबांना मिळणाऱ्या योजनांचा निधी हडपताना या नेत्यांना कसलंही दु:ख होत नसल्याचा आरोप मोदींनी केला.
तृणमूल काँग्रेसचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे, त्यामुळे बंगालची निराशा झाली आहे. मोठ्या उम्मेंदीने बंगालच्या जनतेने वेळोवेळी ममता बॅनर्जींना सत्ता दिली, मात्र अत्याचार आणि विश्वासघाताशिवाय जनतेच्या पदरात काहीही पडलेलं नाही. विकासापेक्षा हा पक्ष भ्रष्टाचार आणि घराणेशाहीत गुंतला आहे. मां, माटी आणि मानुष सर्वांचीच निराशा झाली आहे.
संदेशखालीतील महिला न्यायाची याचना करत राहिल्या मात्र टीएमसी सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. राज्यातील गुन्हेगारी इतकी वाढली आहे की, कधी शरण यायचं आणि कधी अटक करायची हे गुन्हेगार ठरवतात. संदेशखालीच्या गुन्हेगाराला अटक व्हावी असं राज्य सरकारला वाटतं नव्हतं. मात्र बंगालच्या महिला दुर्गाबनून उभे राहिल्या त्यावेळी भाजपने त्यांना पाठिंबा दिला. त्यापुढे राज्य सरकारला झुकावं लागलं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
येणाऱ्या काळात भाजपचं सरकार आल्यानंतर असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे. बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागांवर कमळ फूलणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार गरिबांना ५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत करतं, मात्र टीएमसी बंगाल सरकार लोकांपर्यंत याचा लाभ पोहोचू देत नाही. २०१४ मध्य़े बंगालमध्ये केवळ १४ सरकारी वैद्यकीय महाविद्यालये होती. मागच्या १० वर्षात याची संख्या दुप्पट आहे. लोक गरीबच राहावेत अशी सराकारची इच्छा आहे, कारण यांचं राजकारण त्याच्यावर चालतं. काही दिवसांपूर्वी राज्यात एम्सचं उद्घाटन केलं, मात्र राज्य सरकारला ते आवडलं नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी ममतांवर केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.