NITISH KUMAR RESIGNS AS BIHAR CHIEF MINISTER | NEW OATH ON NOVEMBER 20 saam tv
देश विदेश

Nitish Kumar: बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्या; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Nitish Kumar Resign chief minister post: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आपल्या राजीनामा सुपूर्द केला आहे. नितीश कुमार २० नोव्हेंबर रोजी १० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

Bharat Jadhav

  • नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.

  • पाटणा येथील गांधी मैदानात शपथविधी सोहळा होणार आहे.

  • शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नितीश कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे राजीनामा सूपूर्द केला. नितीश कुमार उद्या २० नोव्हेंबर रोजी पटना येथील गांधी मैदानात १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधीच्या आधी म्हणजेच आज एनडीएच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एकमताने विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यसह चिराग पासवान आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कुमार जयस्वाल उपस्थित होते.

दरम्यान नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने (NDA) २०२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. भाजपने ८९, तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने ८५ जागा जिंकल्या. त्याचबरोबर चिराग पासवान यांच्या लोक शक्ती पार्टीनं (रामविलास ) १९ जागा जिंकल्या. जीतन मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) नं ५ आणि उपेंद्र कुशवाह याच्या राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षानं ४ जागा जिंकल्या.

यावेळी बिहारमध्ये विक्रमी मतदान झालं. ६७.१३ टक्के मतदान झाले असून ते १९५१ च्या नंतर झालेल्या मतदानांच्या तुलनेत जास्त आहे. यात महिला मतदारांनी ७१.६ टक्के तर पुरुषांनी ६२.८ टक्के मतदान केलं.

शपथविधी समारंभाला कोण-कोण येणार?

नितीश कुमार उद्या २० नोव्हेंबर रोजी शपथविधीच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एनडीएचे इतर पक्षातील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. एनडीए शासित राज्यातील मुख्यमंत्री सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याआधी पटना येथील निवासस्थानी झालेल्या जेडीयू पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांना विधीमंडळाचा नेता म्हणून निवडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

Suraj Chavan New House: गुलीगत स्टारचं अलिशान घर, डोळे दिपवणारं इंटेरिअर

Maharashtra Live News Update: बिहारच्या यशाचं अभिनंदन करण्यासाठी अमित शहांची भेट - एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या राजकारणात 'कुछ तो बडा होने वाला है'; अमित शहांसोबत एकनाथ शिंदेंची ५० मिनिटे चर्चा

SCROLL FOR NEXT