अपघाताचा थरार! भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, धुळवडीच्या दिवशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर

bhandara accident : भंडाऱ्यात भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. धुळवडीच्या दिवशी कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Beed accident
representative imageSaam tv
Published On

भंडाऱ्याच्या खरबीत भरधाव कारनं दुचाकीस्वारांना चिरडलं.

एका तरुणाचा जागीच मृत्यू

संतप्त गावकऱ्यांनी केली कारची तोडफोड

शुभम देशमुख, साम टीव्ही

भंडारा : तुमसर-भंडारा मार्गावरील खापा खरबी फाट्याजवळ एका भरधाव कारनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य दोन गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अपघातग्रस्त कारची तोडफोड करत महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

आज मंगळवारी दुपारी एक चारचाकी वाहन तुमसरकडून भंडाऱ्याच्या दिशेनं अतिवेगानं जात असताना खापा खरबी गावाजवळ या कारनं एका दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार गोलू कांबळे (३२) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील इतर दोन प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती मिळताचं परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र, घटनेची माहिती देऊनही पोलीस प्रशासनाला पोहोचायला उशीर झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावानं अपघातग्रस्त कारवर दगडफेक करत तिची तोडफोड करीत मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल ४ तास वाहतूक रोखून धरली.

Beed accident
क्रिकेट विश्वावर शोककळा, दिग्गज खेळाडूच्या वडिलांचं निधन

अखेर पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची समजूत काढली. मृताच्या कुटुंबीयांना योग्य मदतीचं आश्वासन दिल्यानंतर आणि प्रशासनानं तोडगा काढल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं. तब्बल ४ तासांनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com