Bihar Election Result: बिहार निवडणुकीचं महाराष्ट्र कनेक्शन; मुख्यमंत्री फडणवीसांचा करिष्मा, जेथे प्रचार तेथे गुलाल; ४९ एनडीए उमेदवार आघाडीवर

Devendra Fadnavis Magic Works in Bihar: बिहार विधासभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये एनडीएने २०० जागांवर आघाडी घेतलीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा मोठा प्रभाव पडलाय. त्यांनी ज्या-ज्या मतदारसंघांमध्ये प्रचार केला त्या ठिकाणीचे उमेदवार आघाडीवर आगेत.
Devendra Fadnavis Magic Works in Bihar
CM Devendra Fadnavis’ campaign influence clearly visible as NDA takes a commanding lead in Bihar.saam tv
Published On
Summary
  • बिहार निवडणुकीत एनडीए २०० पार

  • महाआघाडीला केवळ ३५ जागांचा कल

  • फडणवीस यांनी प्रचार केलेल्या ६१ मतदारसंघांपैकी बहुतेक ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर केला जात आहे. सुरुवातीच्या कलानुसार एनडीएन बहुमत मिळवलंय. तर महाआघाडीचा मोठा पराभव होताना दिसत आहे. एनडीएनं २०० पार गेल्याच दिसत आहे. तर महाआघाडीला फक्त ३५ जागा मिळत आहेत. याचदरम्यान बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा मोठा वाटा आहे. फडणवीस हे भाजपच्या निवडणूक प्रचारक होते. त्यांनी घेतलेल्या जवळपास सर्वच मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर आहेत.

आतापर्यंत एनडीएनं २०२ जागांवर आघाडी घेतलीय. यात भाजप ९२, जेडीयू-८२, एलजेपी-२१ आणि इतर पक्षांनी ९ जागांवर आघाडी घेतली आहेत. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. फडणवीस यांच्या प्रचाराचा एनडीएला मोठा फायदा झालाय. मुख्यमंत्री फडणवीस यांचा बिहारमधील ६१ मतदारसंघांवर प्रभाव दिसून येत आहे.

Devendra Fadnavis Magic Works in Bihar
Tejashwi Yadav: मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पराभवाच्या छायेत, तेजस्वी यादव पिछाडीवर; RJD ची अवस्था बिकट

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बिहारमधील ६१ मतदारसंघामध्ये एनडीएच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. त्यातील ४९ मतदारसंघातील उमेदवार हे आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ७ जिल्ह्यामध्ये एनडीएच्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी १ आणि २ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा आणि रॅली केल्या होत्या.

Devendra Fadnavis Magic Works in Bihar
Bihar : जलवा है हमारा यहाँ! बिहारमध्ये चिराग पासवान चमकले? निवडणुकीत नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेले जिल्हे

- सारन

- सिवान

- पाटणा

- मुझफ्फरपूर

- सहरसा

- खगडिया

- समस्तीपूर

सारन - १० पैकी ९ एनडीए उमेदवार आघाडीवर

सिवान - ८ पैकी ६ एनडीए उमेदवार आघाडीवर

पाटणा - १४ पैकी ११ एनडीएचे उमेदवार आघाडीवर

मुझफ्फरपूर- ११ पैकी १० एनडीए उमेदवार आमदार

सहरसा - ४ पैकी ३ एनडीए उमेदवार आघाडीवर

खगडिया - ४ पैकी चारही एनडीए उमेदवार आघाडीवर

समस्तीपूर - १० पैकी ६ एनडीए उमेदवार आघाडीवर

बिहार निवडणुकीतील राघोपूर ही सर्वात लोकप्रिय जागा आहे. लालू प्रसाद यादव यांचे धाकटे सूपुत्र आणि राजद नेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजप उमेदवार सतीश कुमार यादव आव्हान देत आहेत. प्रत्येक फेरीनंतर तेजस्वी यादव पिछाडीवर जाताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com