Maharashtra Politics: पुन्हा काका-पुतण्यात दुरावा! बिहार निवडणुकीच्या धामधुमीत भाजपनं खेळला डाव, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Nashik Politics: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी हाती आलीय. भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा खेळी खेळत काका-पुतण्यामध्ये तेढ निर्माण केलीय. या खेळीमुळे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra Politics
Shiv Sena’s potential mayoral candidate Hemant Waje switches to BJP before Sinnar polls.Saam tv
Published On
Summary
  • सिन्नर निवडणुकीत ठाकरे सेनेला मोठा धक्का

  • संभाव्य नगराध्यक्ष उमेदवार हेमंत वाजे भाजपमध्ये प्रवेश

  • ठाकरे गटाचे स्थानिक समीकरण बदलण्याची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय उलाढाली वाढल्या आहेत. अनेक जिल्ह्यात पक्षप्रवेशाच्या कार्यक्रम सोहळे चालू आहेत. नव्या संधीच्या शोधार्थ असणाऱ्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या. त्याचबरोबर अनेक पक्ष स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवत आहेत. त्यासाठी इतर पक्षातील जे प्रतिस्पर्धी ठरतील त्या पक्षांमध्ये खिंडार पाडून तेथील नेत्यांना गळ घालत आहेत.

त्याचप्रमाणे भाजपनं पुन्हा एकदा डाव खेळत नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. विशेष म्हणजे भाजपनं ठाकरे गटाच्या संभाव्य नगराध्यक्षाच्या उमेदवारालाच पक्षातून फोडून आपल्या गटात सामील केलंय. पुढील महिन्यात म्हणजे २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: ठाकरेंविरोधात पवार-शिंदे एकत्र; स्थानिक निवडणुकीसाठी नवं समीकरण, राजकारणात नवा सोलापूर पॅटर्न

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. पक्षांतराला वेग आलाय. आता शिवसेना ठाकरे गटाला भाजपनं मोठा धक्का दिलाय. भाजपने पु्न्हा एकदा काका-पुतण्यांमध्ये दरी निर्माण केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका हेमंत वाजे यांना आपल्या पक्षात ओढून आणलंय. हेमंत वाजे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Politics
'अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार'; दानवेंच्या दाव्याने मोठी खळबळ

हेमंत वाजेंना गळाला लावत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी खेळी खेळलीय. हेमंत वाजे हे शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार होते. आता भाजपने शिवसेना ठाकरे गटाचा थेट नगराध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवारच गळाला लावलाय. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे.

Maharashtra Politics
Bihar Election: भाजपच्या लाटेमुळे अजितदादांचा डाव चुकला; बिहारमध्ये सुपडासाफ, अनेकांचे डिपॉझिट जप्त

दरम्यान हेमंत वाजे हे यापूर्वी सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राहिलेत. त्याचप्रमाणे ते गटनेता आणि उपनगराध्यक्ष देखील होते. तर त्यांच्या आई रुक्मिणी वाजे या आमदार होत्या. तर वडील देखील नगराध्यक्ष होते. भाजपच्या या खेळीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com