

भाजप-जेडीयू युतीने मोठा विजय मिळवला आहे.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाहीये.
अनेक राष्ट्रवादी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं. महाराष्ट्राप्रमाणेचबिहारचे निकाल लागलेत. भाजप-जेडीयूच्या एनडीएला २०० पेक्षा जास्त जागांवर विजयी आघाडी मिळताना दिसत आहे. तर काँग्रेस-राजद महाआघाडीला केवळ ३९ जागांवर आघाडी मिळत आहे. बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीचा सुपडासाफ झालाच पण निवडणुकीत अजित दादांसुद्धा फटका बसलाय. अजित पवार यांनी यांच्या राष्ट्रवादीला एकाही जागा जिंकता आली नाहीये.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, एनडीएने २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे महाआघाडीला मात्र ३२ जागांवरच आघाडी मिळताना दिसत आहे. दरम्यान २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदना प्रक्रिया पार पडली.
आज ४६ केंद्रावर मतमोजणी केली जात आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी असणारे अजित पवार यांनीही बिहारमध्ये नशीब अजमावत आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.
बिहार विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एकाही जिंकता आली नाहीये. साधी आघाडीही घेता आलेली नाही. बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १३ जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या या उमेदवारांना मतंही खूप कमी पडलीत.
उमेदवारांना अद्याप ५०० मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाहीये. बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या महत्त्वाकांक्षा तुटली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.