Iran-Israel War: इराण-इस्रायलच्या युद्धाचा भारताला मोठा फटका; फक्त २५ दिवस पुरेल इतकाच देशात तेलसाठा

Iran-Israel War US Impact: मध्य पूर्वेतील संघर्षादरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक तेल बाजारपेठेत खळबळ उडालीय. जगातील सुमारे २० टक्के कच्चा तेलाची वाहतूक या समुद्री मार्गाने होते.
Iran-Israel War US Impact:
Hormuz Strait tensions raise global oil concerns as India reviews its crude oil reserves.saam tv
Published On
Summary
  • होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक तेल बाजारपेठेत खळबळ.

  • भारताकडे सध्या २५ दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध.

  • धोरणात्मक पेट्रोलियम साठे सुमारे ७४ दिवस टिकू शकतात.

पश्चिम-आशिया (मध्य पूर्वेतील) इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षादरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाला आहे. यामुळे जागतिक तेल बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. जगातील जवळजवळ २० टक्के कच्चे तेलाची वाहतूक या समुद्रमार्गातून होते. परंतु आता इराणने हा मार्ग बंद केल्याने तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत.पण भारतासाठी काहीसा दिलासा आहे. सरकारी सूत्रांनुसार, आपली परिस्थिती अजूनही मजबूत आहे. एका वृतसंस्थेच्या वृत्तानुसार, आपल्याकडे २५ दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे.

Iran-Israel War US Impact:
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मेडिकल अलाउंस २०,००० रुपयांपर्यंत वाढणार; जाणून घ्या ८ व्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट

फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत माहिती दिली होती की, कोणत्याही जागतिक उलथापालथीमुळे उद्भवणाऱ्या मागणीला पूर्ण करण्यासाठी भारताचे धोरणात्मक पेट्रोलियम साठे ७४ दिवस टिकू शकतात. केवळ भूमिगत गुहांमध्येच नाही तर आमच्या रिफायनरीजमध्येही तेल साठ्याचे मूल्यांकन करतो.

Iran-Israel War US Impact:
Gold Price: सोन्याच्या दरवाढीचा स्फोट होणार, सोनं ३ लाखांवर जाणार; तज्ज्ञांचा धडकी भरवणारा अंदाज

आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील गुहांमध्ये साठा आहे आणि आम्हाला लवकरच ओडिशामध्ये काम सुरू करण्याची आशा असल्याचं पुरी म्हणाले होते. मात्र जागतिक तेलाच्या पाचव्या भागासाठी महत्त्वाचा वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी इराण बंद करण्याच्या शक्यतेमुळे ऊर्जा संकटाची चिंता वाढलीय. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर-इन-चीफ यांचे सल्लागार इब्राहिम जब्बारी यांनी मंगळवारी घोषणा केली की होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली.

"जो कोणी येथून जाण्याचा प्रयत्न करेल त्याला आमचे नौदल, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि लष्करी जवान नष्ट करतील. जर त्यांनी या क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना निश्चितच गंभीर आणि निर्णायक संघर्षाला सामोरे जावे लागेल," असे ते म्हणाले होते. आंतरराष्ट्रीय समुदायाला इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची पूर्ण जाणीव आहे.

हे संकट केवळ या प्रदेशापुरते मर्यादित राहणार नाही. "जग आंधळे नाहीये. प्रत्येकजण पाहत आहे, जर त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले किंवा अज्ञानाचे नाटक केले तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com