Shreya Maskar
अननस करी प्रामुख्याने केरळ आणि इतर दक्षिण भारतीय राज्यांमध्ये (तामिळनाडू, गोवा) लोकप्रिय आहे. तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट अननस करी बनवा.
अननस करी बनवण्यासाठी अननस, नारळाचे दूध, तांदळाचे पीठ, नारळाचे तेल, मोहरी, जिरे, हळद, हिरव्या मिरच्या, आले- लसूण, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, मीठ आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.
अननस करी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी आणि जिरे घाला. गॅस कमी आचेवर ठेवून द्या.
मोहरी, जिरे तडतडल्यावर त्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरच्या घाला. त्यानंतर लगेच नारळाचे दूध घालून सतत ढवळत रहा. जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
आता यामध्ये तांदळाचे पीठ घाला. त्यानंतर हळद, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा. तुम्ही यात कापलेले ड्रायफ्रूट्स आणि केशर देखील टाकू शकता.
शेवटी ग्रेव्हीमध्ये अननसाचे तुकडे आणि कढीपत्ता घाला. तुम्ही नंतर राई-जिऱ्याचा तडका देखील देऊ शकता. आंबट-गोड अननस करीचा आस्वाद घ्या.
अननसात व्हिटॅमिन सी, मँगनीज असते. जे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील सूज कमी करते. हे हृदयाचे आरोग्य, हाडे मजबूत करणे आणि त्वचा सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. हे कमी कॅलरीजचे एक उत्तम फळ आहे.