Holi Breakfast : बाहेरून खुसखुशीत अन् आतून रसाळ; होळीला खास घरीच बनवा हलवाई स्टाइल बालूशाही

Shreya Maskar

होळी सण

होळीला गोड पदार्थांमध्ये काही वेगळे आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर बालूशाही हा उत्तम पदार्थ आहे. तसेच याची रेसिपी देखील सिंपल आहे.

Holi | yandex

बालूशाही

बालूशाही हा प्रामुख्याने उत्तर भारत आणि बिहारमध्ये बनवला जातो. हा तेथील एक पारंपारिक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. चवीला खूपच टेस्टी आहे.

Balushahi | yandex

साहित्य

बालूशाही बनवण्यासाठी मैदा, मीठ, तूप, पाणी, साखर, वेलची पूड इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात ड्रायफ्रूट्सचे काप देखील टाकू शकता.

Balushahi | yandex

कोमट पाणी

बालूशाही बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मैदा, तूप, मीठ घालून कणिक मळून घ्या. कोमट पाण्यात कणिक मळा. जेणेकरून पीठ छान मऊ होईल.

Warm water | yandex

पद्धत

कणिकेची जाडसर पोळी लाटा. त्यानंतर सुरीने मधोमध कापा आणि एका बाजूवर दुसरी बाजू ठेवा, पुन्हा मधोमध कापा असे २-४ वेळा करा. जेणेकरून बालूशाहीचा गोल आकार येईल.

Balushahi | yandex

केशर

त्यानंतर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात पेढ्याच्या आकाराची बालूशाही खरपूस तळून घ्या. बालूशाही तळताना गॅस कमी आचेवर ठेवून द्या.

Saffron | yandex

पाक बनवा

आता पॅनमध्ये साखरेचा पाक बनवा. त्यात वेलची टाका आणि तयार बालूशाही काही वेळ पाकात बुडवून ठेवा. जेणेकरून बालूशाही मऊ आणि गोड होतील.

Balushahi | yandex

ड्रायफ्रूट्स

तयार बालूशाही एका ताटात काढा आणि त्यावर केशर, कापलेले ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाका. अशाप्रकारे शाही बालूशाही तयार झाली आहे.

Dry Fruits | yandex

NEXT : मुठभर तांदळापासून घरीच बनवा टोपभर मुरमुरे, लहान मुलांसाठी पौष्टिक नाश्ता

Murmura Recipe | saam tv
येथे क्लिक करा....