Murmura Recipe : मुठभर तांदळापासून घरीच बनवा टोपभर मुरमुरे, लहान मुलांसाठी पौष्टिक नाश्ता

Shreya Maskar

मुरमुरे

मुरमुरे बनवण्यासाठी तांदूळ, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते. मुरमुरे हे एक हलके, कमी कॅलरी आणि पचायला सोपे पौष्टिक स्नॅक आहे.

Murmura | yandex

तांदूळ

मुरमुरे बनवण्यासाठी तांदूळ हलक्या हाताने धुवून 8 ते 10 तास भिजत ठेवा. यामुळे भिजलेल्या तांदळात पाणी चांगले मुरते आणि मुरमुरे जास्त फुलतात.

Rice | yandex

स्टीमर

भिजवल्यानंतर पाणी गाळून तांदळाला 20 मिनिटे बाजूला ठेवा. आता भिजवलेले तांदूळ स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रात हलक्या आचेवर वाफवून घ्या.

Steamer | yandex

तांदळाचे दाणे

वाफवताना तांदळाचे दाणे मऊ झाले पाहिजेत. जेणेकरून त्यांना चांगला पोत येईल. वाफ काढल्यावर तांदूळ मोठ्या कापडावर पसरवून पूर्णपणे सुकवा. दाणा ओलसर राहणार नाही याची काळजी घ्या.

Rice | yandex

तांदूळ रोस्ट करा

तांदळाचे दाणे १०-१५ मिनिटे मायक्रोवेव्हमध्य हलक्या तापमानावर भाजून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये मीठ टाकून त्यात तांदूळ टाका आणि भाजा.

Murmura | yandex

स्टोर करा

तयार मुरमुरे हवा बंद डब्यात ठेवून द्या. जेणेकरून ते नरम होणार नाही आणि महिना चांगले टिकतात. लहान मुलांसाठी हा एक हेल्दी नाश्त्याचा ऑप्शन आहे.

Murmura | yandex

वजन कमी

मुरमुरे वजन कमी करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करतात. यात लोहफॉलिक ॲसिड आणि इतर पोषक घटक आढळतात.

Weight loss | yandex

मजबूत हाडे

डाएटमध्ये नियमित मुरमुरे खाल्ल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते. तसेच हाडांची ताकद देखील वाढते.

Strong bones | yandex

NEXT : सँडविच ढोकळा कधी खाल्ला आहात का? होळीला करा कलरफुल नाश्ता, पेटपूजा होईल बेस्ट

Holi Party 2026 | yandex
येथे क्लिक करा...