Holi Party 2026 : सँडविच ढोकळा कधी खाल्ला आहात का? होळीला करा कलरफुल नाश्ता, पेटपूजा होईल बेस्ट

Shreya Maskar

सँडविच ढोकळा

सँडविच ढोकळा बनवण्यासाठी इडली बॅटर, इनो, बेकिंग सोडा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, शेंगदाणे, मीठ, जिरे, लिंबाचा रस, पाणी, मोहरी, पांढरे तीळ, कढीपत्ता आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Sandwich Dhokla | yandex

पाणी

सँडविच ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी उकळवू‌न घ्या. १० ते १५ मिनिटांसाठी प्री - हिट करा.

Water | yandex

इडली बॅटर

एका ताटाला तेल लावून त्यात तयार इडली बॅटर ओता. नीट पसरवून घ्या. बॅटरमध्ये चिमूटभर इनो किंवा बेकिंग सोडा घाला. ५-१० मिनिटे इडली हलक्या वाफेवर शिजवून घ्या.

Idli | yandex

शेंगदाणे

मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, शेंगदाणे, चवीनुसार मीठ, जिरे, लिंबाचा रस आणि थोडं पाणी घालून पेस्ट वाटून घ्या.

Peanuts | yandex

चटणी

तयार चटणी एका बाऊलमध्ये काढून त्यात थोडे इडली बॅटर मिक्स करा. जेणेकरून चांगला हिरवा रंग पदार्थाला येईल.

Chutney | yandex

ढोकळ वाफवा

ढोकळ्याच्या पहिल्या लेअरवर हिरव्या मिरचीची पेस्ट घालून वाफेवर शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यावर चटणीत मिक्स केलेले इडली बॅटर ओता आणि पुन्हा ५ मिनिटे वाफवून घ्या. यावर परत हिरव्या मिरचीचे वाटण घाला आणि वाफवा. असे २-३ वेळा करा. शेवटी ७-८ मिनिटे ढोकळा व्यवस्थित वाफवून घ्यावा.

Sandwich Dhokla | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, पांढरे तीळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. फोडणी तडतडल्यावर ती सँडविच ढोकळ्यावर टाका.

Sandwich Dhokla | yandex

ढोकळा-चटणी

सँडविच ढोकळ्याचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तसेच होळी पार्टीसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे.

Sandwich Dhokla | yandex

NEXT : होळी पार्टीसाठी घरीच बनवा खुसखुशीत समोसे, रंग खेळून आल्यावर करा पोटभर नाश्ता

Holi Party 2026 | saam tv
येथे क्लिक करा...