Shreya Maskar
यंदा 3 मार्चला होळी हा सण आला आहे. होळीला आवर्जून पुरणपोळ्या बनवल्या जातात. मात्र होळी पार्टीला काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर पनीर समोसा बनवा. झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या.
पनीर समोसा बनवण्यासाठी किसलेले पनीर, मैदा, कांदा, हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर, जिरे, लिंबाचा रस, बटर, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात चीज देखील टाकू शकता.
पनीर समोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा, बटर आणि मीठ एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्या. त्यानंतर पीठ एका ओल्या कपड्याने झाकून ठेवा. जेणेकरून ते चांगले मुरेल.
पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात जिरे, हिरवी मिरची, कांदा बारीक परतून घ्या. कांदा गोल्डन फ्राय झाल्यावर त्यात लाल मिरची पावडर, लिंबाचा रस, मीठ आणि पनीर टाकून नीट एकत्र करा.
आता मैद्याच्या पीठाचे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्या. यात पनीरचे सारण भरून समोसा बंद करा. तुम्ही असे छोटे छोटे समोसे बनवा.
शेवटी पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये समोसे गोल्डन फ्राय करा. गॅस कमी आचेवर ठेवून द्या. जेणेकरून समोसा चांगला खुसखुशीत होईल आणि चवीला देखील भारी लागेल.
गरमागरम पनीर समोसा हिरव्यागार पुदिन्याच्या चटणीसोबत खा. तसेच तुम्ही गोड चटणी किंवा सॉससोबत याचा आस्वाद घेऊ शकता.