Shivpuri Boat Accident Saamtv
देश विदेश

Madhya Pradesh News: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बोट धरणात बुडाली; ३ चिमुकल्यांसह ७ जणांचा मृत्यू

Shivpuri Boat Accident: मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये धरणामध्ये भाविकांची बोट बुडाली. या दुर्घटनेमध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता भाविकांचा शोध घेतला जात आहे.

Priya More

मध्य प्रदेशच्या शिवपूरमध्ये अत्यंत दु:खद घटना घडली आहे. भाविकांनी भरलेली बोट धरणामध्ये बुडून ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये ८ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहेत. हे सर्व भाविक शिवपुरीतील सिद्धबाबा मंदिरात होळी खेळण्यासाठी जात होते. घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुरीतील सिद्धबाबा मंदिरात होळी खेळण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची बोट धरणामध्ये बुडाली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. शिवपुरीच्या खानियाधना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माता टीला धरणात ही दुर्घटना घडली. भाविकांनी भरलेली बोट धरणाच्या मध्यभागी गेल्यावर बुडाली. बोट बुडाल्यामुळे त्यामधील सर्वजण धरणामध्ये पडले. अनेकांना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने बोटीमधील ८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेले सर्व भाविक हे रजावन गावातील आहेत. या गावातील १५ जण मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास धरणातील एका बेटावर असलेल्या सिद्धबाबा मंदिरात दर्शनासाठी आणि होळी खेळण्यासाठी जात होते. अचानक बोट धरणाच्या मधोमध गेल्यानंतर कलंडली आणि बुडाली. घटनास्थळावर पोलिस, एनडीआरएफची टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. बोटीमधील आणखी काही जण बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

या दुर्घटनेत थोडक्यात बचावलेले खलाशी प्रदीप लोधी यांनी ही दुर्घटना कशी घडली याचा थरार सांगितला. ते म्हणाले की, 'बोटीत पाणी भरल्यामुळे हा अपघात झाला. सर्वात आधी बोटीतील एका महिलेला मागील भागात पाणी भरताना दिसले. काही वेळातच बोटीमध्ये वेगाने पाणी भरू लागले आणि बोट बुडाली.' या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT