
भारत देश हा सर्वाधिक तरुणाई असलेले देश आहे. भारत देशात सर्वाधिक तरुणाईकडे काही न काही नवीन आयडिया असतात. यातील अनेक आयडिया या देशाच्या प्रगतीसाठी असतात. असंच काहीसं मध्य प्रदेशमधील एका विद्यार्थ्याने केले आहे. त्याने ८० किलो वजनाच्या व्यक्तीला हवेत उचलणारा ड्रोन तयार केला आहे. (Madhya Pradesh News)
ग्वाल्हेर येथील एका विद्यार्थ्यांने हा ड्रोन बनवला आहे.मेधांश त्रिवेदी असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या या ड्रोनने नवीन विक्रम रचला आहे.
हा ड्रोन ८० किलो वजनाच्या व्यक्तीला सतत ६ मिनिटे हवेत घेऊन उडू शकतो. या ड्रोनची शक्ती ४५ होर्स पावर आहे. सध्या हा ड्रोन ४ किलोमीटरपर्यंत उड्डाण करु शकतो.या ड्रोनचा वेग ताशी ६० किलोमीटर आहे. (Student Made drone)
हा ड्रोन १.८ मीटर रुंद आणि १.८ मीटर लांब आहे. हा ड्रोन सुरक्षेमुळे आता फक्त १० मीटर उंचीवर उडवला जातो.
आगळावेगळा ड्रोन बनवणाऱ्या मेधांशने सांगितले की, चीनचे ड्रोन पाहून मला हा ड्रोन बनवण्याची प्रेरणी मिळाली. मला माझ्या शिक्षकांनी यासाठी प्रेरणा दिली. त्याचसोबत तांत्रिकदृष्ट्याही मदत केली. मेधांशला एअर टॅक्सी कंपनी आणि स्वस्त हेलिकॉप्टर बनवायचे आहे. (Drone which Carry 80 kg Man)
मेधांशने या ड्रोनमध्ये कृषी ड्रोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ४ मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. त्याला भविष्यात सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ड्रोन तयार करायचा आहे. ज्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला आपण दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. तसेच शेतीमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.