Walmik Karad News : बीड पोलिस दलात कराडच्या मर्जीतील २६ अधिकारी; तृप्ती देसाईंनी अधीक्षक कार्यालयात पुरावेच सादर केले

trupti desai News : बीड पोलीस दलात वाल्मीक कराडच्या मर्जीतील अधिकारी असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आज तृप्ती देसाईंनी अधीक्षक कार्यालयात पुरावे सादर केले.
beed crime
santosh deshmukh case Saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : संतोष देशमुख प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. बीडमधील या हत्याकाडांने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी मोठा आरोप केला आहे. बीड पोलिस दलात वाल्मीक कराडच्या मर्जीतील २६ अधिकारी असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला. त्यानंतर आज पुरावे सादर केले.

बीड जिल्हा पोलीस दलातील २६ अधिकारी कर्मचारी वाल्मीक कराड यांच्या मर्जीतील असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. तृप्ती देसाईंनी आरोप केल्यानंतर बीड पोलिसांनी त्यांना नोटीस धाडली होती. बीड पोलिसांनी दिलेल्या नोटिसीनंतर तृप्ती देसाई अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या. त्यानंतर त्यांचा बीड अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी जबाब घेतला.

beed crime
Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! अचानक लागलेल्या आगीत ५१ जणांचा होरपळून मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

बीड जिल्हा पोलीस दलातील 26 अधिकारी आणि कर्मचारी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या मर्जीतील असल्याची तक्रार तृप्ती देसाई यांनी केली होती. या तक्रारीनंतर बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देसाई यांना दिले होते. याच आदेशावरून आज तृप्ती देसाई पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहिल्या. यादरम्यान पोलीस दलातील २६ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे देसाई यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना सादर केले.

beed crime
Hafiz Saeed Dead : भारताच्या मोठ्या शत्रूचा खात्मा? अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादीवर ठेवलं होतं 1 कोटी डॉलरचं बक्षीस,VIDEO

'बीड पोलीस दलात २६ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे दिले आहेत. त्यासंदर्भात माझा जबाब घेण्यात आला आहे. याचे सर्व पुरावे पेन ड्राइवच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या अधिकारी कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे. त्यातील अनेक कर्मचारी एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आज घेण्यात आलेल्या जबाबानंतर याची गोपनीय चौकशी करू, असं आश्वासन तृप्ती देसाई यांना देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com