Beed: बॉयफ्रेंडसोबत मुलीला पाहिलं, बापाच्या डोक्यात तिडिक गेली, पोराला काळा निळा होईपर्यंत मारलं, पोलिसांची धडक कारवाई

Beed Honor Killing case: बीडमध्ये विकास बनसोडेला मुलीच्या कुटुंबाने बेदम मारहाण केली होती. याच विकासचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतलं आहे.
Vikas Bansode Case
Vikas Bansode CaseSaam Tv
Published On

प्रेम संबंधाच्या संशयावरून बीडमध्ये विकास बनसोडेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. २ दिवस झाडाला बांधून त्याला मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण मुलीच्या वडिलांनी आणि त्याच्या कुटुंबाने केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून, ४ जण फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी २ पोलीस पथके रवाना झाल्या आहेत.

विकासचा भाऊ आकाशनं यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आकाशनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतलंय.

भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भानुदास क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर , संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे, बापूराव शिंदे. अशी आरोपींची नावे आहेत.

Vikas Bansode Case
Sambhajinagar: कुटुंबासोबत जेवण केलं, घरी जाऊन आयुष्य संपवलं; २५ वर्षीय तरूणीनं घेतला टोकाचा निर्णय

तर यापैकी संभाजी झांबरे सचिन भवर, बाबासाहेब क्षीरसागर, बाबुराव शिंदे फरार आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

Vikas Bansode Case
Shocking News: प्रेमाचा असाही अंत! वहिनी दीराच्या प्रेमात अखंड बुडाली, पण शेवटी विष प्राशन करून..

नेमकं कारण काय?

विकास बनसोडे हा २३ वर्षीय तरूण मुळचा जालना जिल्ह्यातील होता. कामानिमित्त तो बीडमध्ये आला होता. आष्टीतील पिंपरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे तो ट्रक चालक म्हणून कार्यरत होता. दरम्यान त्याचं क्षीरसागर यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. याची माहिती क्षीरसागर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आणि त्याच्या कुटुंबाने मिळून विकासला मारहाण केली. ज्यात विकासचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com