
उत्तर मॅसेडोनियाच्या कोकानी शहरात रविवारी रात्री एका नाईट क्लबला आग लागल्याची घटना घडली आहे. नाईट क्लबला लागलेल्या आगीत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत डझनभर लोक जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईट क्लबला लागलेली आग क्षणार्धात सर्वत्र पसरली. रिपोर्टनुसार, नाईट क्लबमधील कॉन्सर्टमध्ये एकूण १५०० लोक उपस्थित होते.
मॅसेडोनियातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईट क्लबला आग ही १५ मार्चला उशिरा रात्री लागली. क्लबमध्ये रात्री कॉन्सर्ट सुरु होता. त्याचवेळी आतिषबाजी झाली. त्यामुळे आग लागल्याचं बोललं जात आहे. नाईट क्लबला लागलेल्या आगीचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उत्तर मॅसोडिनियाच्या शासकीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोकानी शहरातील शासकीय कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. आपात्कालीन व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरु केलं. आगीतील पीडित आणि जखमी लोकांची संख्या मोजण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. कोकानी शहर मॅसेडोनियाची राजधानी स्कोप्जेपासून सुमारे १०० किलोमीटर पूर्वेला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नाईट क्लबला आग रात्री २ वाजता लागली. नाईट क्लबमध्ये उत्तर मॅसेडोनियातील प्रसिद्ध हिपहॉप जोडी एडीएनचा कार्यक्रम सुरु होता. या कॉन्सर्टमध्ये सुमारे १५०० लोक होते. नाईट क्लबलमध्ये आग लागल्यानंतर तासाभराने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाही. या आगीत मृत्यू पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. आगीत मृत्यू पावलेल्या लोकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.