Maharashtra Politics : मविआ भाजपला धक्का देणार? पटोलेंची शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर, राऊतही सकारात्मक? पडद्यामागे काय घडतंय?

Maharashtra political News : नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आणि राऊतांनी पटोलेंना टोला लगावलाय...मात्र पटोलेंच्या ऑफरवर राऊत नेमकं काय म्हणाले आहेत? आणि शिंदे मविआसोबत गेल्यास सत्तेचं समीकरण कसं असेल? पाहूयात या स्पेशल रिपोर्ट....
maha vikas aghadi news
maharashra political News Saam tv
Published On

नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या ऑफरवरुन राजकीय वातावरण तापलंय. पटोलेंच्या वक्तव्यामुळे आपली वाचाच गेल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय. शिंदे आणि अजितदादांना आलटून पालटून सीएम करू, अशी ऑफर नाना पटोले यांनी दिली. 'मी काय बोलणार, माझी तर वाचाच गेली, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हे असं असलं तरी राऊतांनी मात्र पटोलेंच्या विधानाचा थेट विरोध न करता शिंदेंना दिलेली ऑफर स्वीकारल्यास विचार करु, असं म्हणत सूचक संकेत दिलेत. तर नाना पटोलेंनी घाई केली, असं विधान वडेट्टीवारांनी केलंय. नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. राजकारणात कुणी कायमचा दोस्त किंवा दुश्मन नसतो, असे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाविकास आघाडीकडून एकत्र येण्याचे संकेत मिळाले असले तरी सत्तेचं समीकरण यशस्वी होऊ शकतं का? पाहूयात....

महाविकास आघाडी भाजपला धक्का देणार?

महाविकास आघाडीकडे 50 आमदारांचं संख्याबळ

अजित पवारांसोबत 41 आमदारांचं संख्याबळ

एकनाथ शिंदेंकडे 57 आमदारांचं संख्याबळ

शिंदे गट आणि अजित पवार गट मविआसोबत गेल्यास बहुमत शक्य

maha vikas aghadi news
Mahayuti Sarkar: भाजपच्या मंत्र्याचा कारनामा, स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले; संजय राऊत कडाडले

महायुतीत शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये वाढत चाललेला हस्तक्षेप, निधी वाटप याबरोबरच शह काटशहाच्या राजकारणामुळे शिंदे गट अस्वस्थ आहे.. त्यातच आता महाविकास आघाडीकडूनही एकत्र येण्याचे सूचक संकेत देण्यात आले आहेत. विधीमंडळात आमने-सामने आल्यानंतरही एकमेकांशी नजरानजरही न करणारे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना स्वीकारणार का? याकडे लक्ष लागलंय. तसंच गेल्या 5 वर्षात भिन्न विचारधारांचे पक्ष एकत्र आलेत.. त्यामुळे विचारधारांना तिलांजली देऊन पटोलेंच्या दाव्यानुसार पुन्हा टोकाच्या विचारधारा असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com