Mahayuti Sarkar: भाजपच्या मंत्र्याचा कारनामा, स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले; संजय राऊत कडाडले

Maharashtra ministers controversy: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.
MAhayuti
MAhayutiSaam Tv News
Published On

अर्थसंकल्प अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीला कोंडीत पडकलंय. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप करत सरकारला खडेबोल सुनावले आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवर यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि उत्तर महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यानं पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन हडपल्याचा आरोप केलाय.

यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही गोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. हल्लाबोल करताना राऊतांनी जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केलेत. मंत्री गोरे यांनी विकृतीचा कळस गाठला असल्याचं राऊत म्हणालेत.

जयकुमार गोरे विकृत मंत्री

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केलंय. ते एक विकृत मंत्री आहेत'. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा मंत्री गोरे यांनी छळ केलाय', असा घणाघाती आरोप राऊत यांनी केलाय.

MAhayuti
Pune News: बस चालकाचा प्रताप! दारू पिऊन चालवत होता बस; तरूणाला चिरडलं आणि मग..

'मंत्री गोरे यांनी त्या महिलेचा छळ आणि विनयभंग केलाय. याची माहिती आता समोर आलीय. ती महिला आता काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 'तसेच हा गंभीर प्रश्न असून, विधानभवनात अधिवेशनात हा प्रश्न उठवावा लागेल', असंही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, राऊतांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

MAhayuti
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना आवडते 'ही' मराठी अभिनेत्री

विजय वड्डीवार नेमकं काय म्हणाले?

'सरकारमध्ये धिंगाणा सुरू आहे. एका पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्र्यानं विवस्त्र फोटो महिलेला पाठवले होते. त्यानंतर तो मंत्री १० दिवस तुरूंगाची हवा खातो. पण मंत्री झाल्यावर त्या महिलेच्या मागे लागतो.

आणखी एक उत्तर महाराष्ट्रातील मंत्री माजी महिला राष्ट्रपतींची जमीन ढापतो. तसेच मान वर करून मंत्रीमंडळात फिरतो. लज्जास्पद अन् काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी वाढत चालली आहे. अशांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार आहे का?' असा सवाल आमदार विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com