Eknath Shinde And Uddhav Thackeray Video
Eknath Shinde And Uddhav Thackeray Video Eknath Shinde And Uddhav Thackeray Video

Eknath Shinde Video: फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना नमस्कार, एकनाथ शिंदेंचं मात्र 'नो Attention', ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिलं नाही!

Eknath Shinde And Uddhav Thackeray Video: विधानभवनातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत. मात्र त्यांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्ध नाहीये.
Published on

महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पावरून विरोधकांना टीका केलीय. दुसरीकडे अर्थसंकल्पाचं वाचन झाल्यानंतरचा विधानभवनातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले दिसत आहेत. समोर उभ्या असलेल्या उद्धव ठाकरेंकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधं ढुंकूनही पाहिलं नाही. उद्धव ठाकरेंनीही शिंदेंकडे दुर्लक्ष केलंय. दोन्ही नेत्यांची नजरानजर झाली नाहीये.

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही’ असं म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या, मात्र यात लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत कोणतीच ठोस घोषणा करण्यात आली नाहीये. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केलीय.

Eknath Shinde And Uddhav Thackeray Video
Maharashtra Assembly Budget: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; महायुती सरकार येत्या ५ वर्षात मुंबई, नागपूर आणि पुण्यात विणणार मेट्रोचं जाळं

हा पूर्ण बजेट पूर्णपणे निराशाजनक आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा असून यात कोणत्याही योजना नाहीत, तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका विरोधकांनी केली. याचदरम्यान एका व्हिडिओची चर्चा जोरात होतेय. हा व्हिडिओ आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा. हा व्हिडिओ विधानभवनातील असून एका सभागृहात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे बोलतांना दिसत आहेत.

Eknath Shinde And Uddhav Thackeray Video
Maharashtra Budget 2025 : महायुती सरकारचा सर्वसामान्यांना दणका; कार महागणार

त्याचवेळी फडणवीस यांच्या पाठीमागून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यावेळी शिंदेंनी ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिलं नाही. या घटनेची दृश्ये प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी अजूकपणे टिपली आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये

विधानभवनातील मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना हात जोडून नमस्कार केला. त्यावेळी ठाकरेंनी स्मितहास्यासह फडणवीसांना नमस्कार केला. दोघांमध्ये चर्चा देखील झाली. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले.

तेव्हा मुख्यमंत्री पुढे निघून गेले. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं पाहिलं. पण एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे लक्ष न देता बाजुकडून पुढे निघून गेले. उद्धव ठाकरेंकडे शिंदेंनी ढुंकूनही पाहिलं नाही. यामुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com