Mohammed Shami : रंग उधळताय, शरीयतचा अनादर करताय.. लेकीने होळी खेळल्याने मोहम्मद शमीवर भडकले मौलाना

Mohammed Shami Daughter : मोहम्मद शमीची लेक आयरा शमीने रंग खेळून होळीचा सण साजरा केला होता. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. या प्रकरणावरुन ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्षांनी शमीवर टीका केली आहे.
Mohammed Shami Daughter
Mohammed Shami DaughterSaam Tv
Published On

रोजा न पाळल्याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात आले होते. ऑल इंडिया मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी शमीवर टीका केली होती. या मौलवींनी आता शमीच्या लेकीवर टीका केली आहे. शमीची लेक आयरा रंगांनी होळी खेळली होती. यावरुन मौलाना रझवी भडकले आहेत.

'मोहम्मद शमीची लेक अजून लहान आहे. तिने अनावधानाने रंगानी होळी खेळली असेल, तर त्याला गुन्हा म्हणता येणार नाही. पण तिला समजूतदार असेल आणि तिने मुद्दामून होळी खेळली असेल तर शरीयतनुसार हा गुन्हा आहे', असे मौलाना शाहबुद्दीन रझवी असे म्हणाले. 'शमीने रोजा न पाळून पाप केले आणि आता त्याची लेक होळी खेळताना दिसतेय' असेही रझवी म्हणाले.

Mohammed Shami Daughter
Virat Kohli : 'एकटं उदास बसण्यापेक्षा...' बीसीसीआयच्या 'त्या' नियमावर विराटचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला किंग कोहली?

'यापूर्वीही शमीला इस्लामच्या सिद्धांतांचे पालन करण्याचा आम्ही सल्ला दिला होता. असे असूनही त्याच्या मुलीचा रंग खेळत होळी साजरी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. जे शरीयतमध्ये नसेल, त्या गोष्टींमध्ये तुमच्या मुलांना सहभागी करु नका. हिंदूंसाठी होळी हा मोठा सण आहे, पण मुसलमानांनी होळी साजरी करता कामा नये. शरीयतची तत्त्वे माहीत असूनही जर कोणी होळी खेळत असेल, तो गुन्हा करत आहे', असे वक्तव्य मौलाना रझवी यांनी केले.

Mohammed Shami Daughter
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान रमजान महिन्याला सुरुवात झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे मोहम्मद शमीने रोजा म्हणजेच उपवास ठेवला नव्हता. त्यावरुन मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी शमीवर टीका केली होती. रझवी यांनी शमी आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना शरीयतचा अनादर करु नये असे म्हटले आहे.

Mohammed Shami Daughter
औरंगाबाद नाही तर 'हे' होतं छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव, काय आहे इतिहास? वाचा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com