Virat Kohli : 'एकटं उदास बसण्यापेक्षा...' बीसीसीआयच्या 'त्या' नियमावर विराटचं वक्तव्य चर्चेत, काय म्हणाला किंग कोहली?

Virat Kohli BCCI : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारताचा पराभव झाला होता. तेव्हा भारतीय क्रिकेट बोर्डाने कठोर नियम संघावर लागू केले होते. त्या विषयी विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
Virat Kohli BCCI
Virat Kohli BCCISaam TV
Published On

Virat Kohli Statement : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाची डब्लुटीसी फायनलमध्ये जायची संधी हुकली. यामुळे बीसीसीआयने काही नवे नियम लागू केले. यातील एक नियम हा खेळाडूंच्या कुटुंबबद्दल होता. दौऱ्यादरम्यान खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांला वेळ देण्याची मर्यादा कमी करण्यात आली होती. या नियमावर विराट कोहलीने एका कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली.

आयपीएल सुरु होण्याआधी आरसीबीच्या एका कार्यक्रमामध्ये विराटने हजेरी लावली होती. 'मैदानात ताणतणाव सहन केल्यानंतर जेव्हा तुम्ही कुटुंबीयांना भेटता, तेव्हा मनात काय भावना असते हे मी लोकांना समजावून सांगू शकत नाही. दौऱ्यामध्ये खराब प्रदर्शन केल्यानंतर कोणत्याही खेळाडूला एकट्याला उदास बसून राहणे आवडणार नाही', असे विराट कोहली म्हणाला.

'ज्या वेळेस दौऱ्यावर असताना खेळाडूंच्या सोबत त्यांचे कुटुंबीय असतात, तेव्हा खेळाडू अधिक जबाबदारीने खेळण्यास मदत होते. तुझ्या कुटुंबासह दौऱ्यावर असताना राहायला आवडेल का असा प्रश्न कोणत्याही खेळाडूला विचारले, तर तो नक्कीच होय असे म्हणेल. मला एकटं उदास बसायला आवडत नाही मला सामान्य जीवन जगायचे आहे. खेळ ही एक जबाबदारी असली तरी ती पूर्ण करुन आयुष्यात परतायचे आहे', असे विराट म्हणाला.

Virat Kohli BCCI
Mohammed Shami : लाज वाटत नाही का, नमाज सोडून रंग उधळतेय? होळी साजरी केल्याने मोहम्मद शमीची लेक ट्रोल

आयपीलएलला २२ मार्च रोजी सुरुवात होणार आहे. सीझनच्या पहिल्याच सामन्यामध्ये बंगळुरूचा संघ खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२५ चा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. विराटच्या मार्गदर्शनाखाली आणि रजत पाटीदारच्या नेतृत्वामध्ये बंगळुरूचा संघ मैदानात उतरणार आहे.

Virat Kohli BCCI
Jasprit Bumrah : बुमराह आयपीएल खेळणार की नाही? आयपीएल सुरु होण्याआधीच दुखापतीची मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com