Moments before disaster – Beechcraft B200 Medevac plane bursts into flames after takeoff near London’s Southend Airport, killing 15 in one of UK’s deadliest recent air crashes. Saam TV News Marathi
देश विदेश

Plane Crash : मोठी बातमी! उड्डाणानंतर विमानाला आग अन् एअरपोर्टजवळ कोसळलं, १५ जणांचा मृत्यू | VIDEO

LONDON MEDEVAC PLANE CRASH : लंडनमधील साऊथएंड विमानतळाजवळ वैद्यकीय विमान कोसळलं. विमानाला आग लागून १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

Namdeo Kumbhar

London Plane Crashes Death Toll Update : अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान कोसळल्याच्या दुर्देवी घटनेला महिना झाला, या कटू आठवणी ताज्या असतानाच आणखी एका विमानाचा एअरपोर्टजवळच अपघात झालाय. रविवारी सायंकाळी लंडनच्या साऊथएंड विमानतळावर विमान कोसळलं. लंडनच्या साउथएंड विमानतळावर वैद्यकीय आपत्कालीन (Medevac) सेवेसाठी असलेले खासगी विमान कोसळलं. या दुर्दैवी घटनेत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुर्घटनेनंतर लंडनमधील साऊथएंड विमानतळावर बंद करण्यात आले आहे. दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

बीचक्राफ्ट बी200 सुपर किंग एअर या खासगी वैद्यकीय आपत्कालीन (Medevac) विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच आग लागून धावपट्टीजवळ कोसळले. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विमानातून काळेकुट्ट धुरांचे लोट आणि ज्वाळा बाहेर निघत असल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेत विमानातील १३ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स अशा १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानाने नेदरलँड्समधील लेलिस्टॅडकडे उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आग लागली आणि ते आगीच्या गोळ्यात बदलले. कोसळण्यापूर्वी विमानातून धूर आणि ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. काहींनी पायलट मदतीसाठी हात हलवताना पाहिल्याचे सांगितले. अपघातानंतर विमानतळ परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर खाली केला. बचावपथकाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अद्याप बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विमानाला नेमकी आग का लागली? याबाबत तपास करण्यात येणार आहे.

एसेक्स पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांनी युद्धपातळीवर काम केले, परंतु तीव्र आगीमुळे बचावकार्यात अडथळे आले. पोलिसांनी मृत्यू किंवा जखमींच्या संख्येबाबत अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. ब्लॅक बॉक्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे कारणांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विमान वैद्यकीय सेवेसाठी वापरले जात असल्याने यात वैद्यकीय कर्मचारी किंवा रुग्ण असण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरण यांच्याकडून तपास सुरू आहे. हा अपघात साऊथएंडच्या इतिहासातील सर्वात भयानक घटनांपैकी एक मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat: महायुतीचे नेते दमानियांच्या रडारवर,शिरसाटांच्या खात्यात 2000 कोटींचा घोटाळा? दमानियांच्या आरोपांनी खळबळ

Ind Vs Eng 3rd Test : रवींद्र जडेजाची झुंज व्यर्थ, लॉर्ड्स कसोटी भारताने गमावली; इंग्लंडचा विजय

Samosa: वेळीच व्हा सावधान! समोसा, जिलेबी धोकादायक, सिगारेटप्रमाणे हानिकारक

Maharashtra Live News Update: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

Maharashtra Politics: नाराजी, राजीनामा अन् भाजप प्रवेश? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT