EPFO New Rule : घर खरेदी करणार्‍यांच्या कामाची बातमी, डाउन पेमेंटची कटकट संपली, वाचा PF चा नवा नियम

EPFO च्या नव्या नियमांनुसार, तीन वर्षे जुने खाते असल्यास पीएफमधून घरासाठी ९०% रक्कम काढता येणार आहे. पहिल्यांदा घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा.
EPFO Account Holder
EPFO Account Holdersaam tv
Published On

EPFO New Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने पीएफ रक्कम काढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, पीएफ खातेदार आपल्या घराचं डाऊन पेमेंटसाठी पैसे काढू शकतात. तीन वर्षे जुनं खातं असल्यास पीएफमधून घरासाठी ९० टक्के रक्कम काढता येणार आहे. पीएफच्या या नव्या नियमांचा घर खरेदी कऱणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार कऱणाऱ्या लाखो लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. स्वप्नातील घर खरेदी करणाऱ्यांना आता ईपीएफओकडूनही हातभार लागणार आहे. यामुळे रियल इस्टेट आणि हाऊसिंग सेक्टरलाही मजबूती मिळेल. (EPFO withdrawal rule change for first-time homebuyers)

financial express च्या रिपोर्ट्सनुसार, EPFO च्या या निर्णायामुळे घर खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. पण यासोबतच पीएफ खात्यामधून पैसे काढताना निवृत्तीच्या फंडाकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे. पीएफ खात्यामधून पैसे काढताना भविष्याचा विचारही करावा, कारण निवृत्तीच्यावेळी तुमच्या खात्यावर मोठी रक्कम जमा असायला हवी. भविष्यातील आर्थिक सुरक्षाही महत्त्वाची आहे, असा सल्ला देण्यात आला आहे. नोकरी करत घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी EPFO चा हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.

EPFO Account Holder
एसटी महामंडळाला विठुराया पावला! पंढरपूर वारीतून तब्बल इतक्या कोटींचे उत्पन्न, सरनाईकांची माहिती

पीएफ खात्यामधून घरासाठी पैसे काढा, पण... What is the new EPFO rule for using PF money for home down payment in 2025?

पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढणे आता अधिक सोपे झालेय. EPFO ने आपल्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय. ईपीएफओच्या नव्या नवीन नियमांनुसार, EPFO सदस्यांचे पीएफ खाते किमान 3 वर्षे जुने आहे, त्यांना पीएफमधील शिल्लक रकमेपैकी 90% पर्यंत रक्कम काढता येईल. ही रक्कम घराच्या डाउन पेमेंटसाठी, होम लोनच्या EMI भरण्यासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी वापरता येईल.

EPFO Account Holder
Air India Plane Crash: 'टेकऑफनंतर ३ सेकंदात दोन्ही इंजिन बंद', २७५ जणांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

आधी नेमका नियम काय होता ?

याआधी ही सुविधा पीएफ खाते किमान 5 वर्षे जुने असेल, तेव्हाच मिळत होती. त्याशिवाय पैसे पीएफ खात्यामधून पैसे काढण्याची मर्यादाही निश्चित केली होती. 36 महिन्यांच्या एकूण पीएफ योगदान आणि प्रॉपर्टीच्या किंमतीपैकी जी रक्कम कमी असेल तेवढेच पैसे काढता येत होते. याशिवाय, जर एखादा सदस्य कोणत्याही हाउसिंग स्कीममध्ये सहभागी असेल, तर तो पीएफमधून पैसे काढू शकत नव्हता. पण आता या नियमांत बदल करण्यात आला आहे.

EPFO Account Holder
८ कोटी EPFO खातेधारकांसाठी खुशखबर, ८.२५ % व्याज जमा, तुमचा बॅलन्स कसा चेक कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com