Air India Plane Crash: 'टेकऑफनंतर ३ सेकंदात दोन्ही इंजिन बंद', २७५ जणांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

What caused the Air India plane crash in Ahmedabad? : अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाणानंतर काही सेकंदात भीषण अपघात झाला. २७५ प्रवाशांचा मृत्यू, इंजिन फेल्युअरचे कारण समोर आले आहे.
Ahmedabad Air India Plane Crash
Wreckage of the Air India plane near Ahmedabad airport after tragic engine failure midair.Saam
Published On

Ahmedabad Air India Plane Crash Report : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातावरील १५ पानांचा रिपोर्ट समोर आला आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान अवघ्या काही सेकंदात कोसळलं होतं, या दुर्घटनेत २७५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना का झाली? याला नेमकं जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले एअर इंडियाच्या विमानातील दोन्ही इंजिन ३ सेकंदात बंद पडली होती, त्यानंतर २९ सेकंदात विमान अहमदाबाद विमानतळाजवळच्या इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत २७५ जणांचा मृत्यू झाला. १२ जून २०२५ रोजी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेचा रिपोर्ट समोर आलाय.

अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानाला उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. प्राथमिक तपासातून विमान दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमानाच्या इंजिनांना इंधनपुरवठा नियंत्रित करणारे स्विच बंद झाल्याने हा अपघात घडला. उड्डाणानंतर तीन सेकंदांतच दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा खंडित झाला. त्यामुळे विमान कोसळले. पायलट आणि सह-पायलट यांच्यातील संवादातून हे स्पष्ट झाले की, को-पायलटने इंधनपुरवठा बंद केला नसल्याचे सांगितले, तरीही 29 सेकंदांत विमान खाली कोसळले.

Ahmedabad Air India Plane Crash
Air India Plane Crashed: "आपणच क्रॅश केलं एअर इंडियाचं विमान..!; प्रियकराला अडकवण्यासाठी तरुणीनं रचला कट

एअर इंडियाने २०१८ च्या एफएए मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे तपासातून समोर आलेय. याप्रकरणी डीजीसीएने कठोर कारवाई करत एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये विभागीय उपाध्यक्ष चुडा सिंग, मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि पायल अरोरा यांचा समावेश आहे. त्यांच्यावर विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. डीजीसीएने क्रू शेड्युलिंगशी संबंधित जबाबदाऱ्यांमधून त्यांना तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले.

Ahmedabad Air India Plane Crash
Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

विमान अपघात कसा झाला? रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे? Why did both engines shut down after takeoff?

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला उड्डाणानंतर अवघ्या 32 सेकंदांत अपघात झाला. तपास अहवालानुसार, उड्डाणानंतर काही सेकंदांतच इंधन कटऑफ स्विच चालू झाल्याने दोन्ही इंजिनांना इंधनपुरवठा बंद झाला. कॉकपिट ऑडिओनुसार, एका पायलटने सह-पायलटला “तू इंधन का बंद केलं?” असा प्रश्न विचारला, यावर सह-पायलटने “मी काहीच केलं नाही” असे उत्तर दिले.

इंजिन बंद झाल्याने रॅम एअर टर्बाइन (RAT) आपोआप चालू झाली. पण इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. इंजिन 1 आंशिकरीत्या सुरू झाले, पण इंजिन 2 कार्यरत झाले नाही. विमान रनवेपासून 0.9 नॉटिकल मैलांवर एका हॉस्टेलवर कोसळले.

थ्रस्ट लिव्हर निष्क्रिय आढळले, पण ब्लॅक बॉक्सनुसार टेकऑफ थ्रस्ट चालू होते.

इंधन स्वच्छ आढळले. त्यामध्ये कोणताही दूषितपणा नव्हता.

फ्लॅप (5 अंश) आणि गियर (डाउन) सामान्य होते.

हवामान स्वच्छ, दृश्यमानता चांगली आणि पक्ष्यांची हालचाल नव्हती.

पायलट अनुभवी, वैद्यकीयदृष्ट्या निरोगी आणि प्रशिक्षित होते.

तोडफोडचा कोणताही पुरावा नाही, पण इंधन स्विचच्या संभाव्य बिघाडाबाबत एफएएची पूर्वसूचना होती. ज्याकडे एअर इंडियाने दुर्लक्ष केले.

विमानाचे वजन आणि संतुलन योग्य होते, आणि कोणतेही धोकादायक सामान नव्हते.

Ahmedabad Air India Plane Crash
Temple Abuse : अभिनेत्रीचा मंदिरात विनयभंग, आशीर्वाद देताना पुजाऱ्याचं घाणेरडं कृत्य, कपडे उतरवण्यासही सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com