Actress Molested by Temple Priest in Malaysia : मलेशियामधील मॉडेल, अभिनेत्री लिशालिनी कनारन हिनेने भारतीय वंशाच्या पुजाऱ्यावर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने ब्लाऊजमध्ये हात घालत घाणेरडं कृत्य केले, कपडेही उतरवायला सांगितल्याचा आरोप लिशालिनी हिने केला आहे. मलेशियातील सेपांग येथील मारिअम्मन मंदिरात ही धक्कादायक घटना घडली आहे. लिशालिनी कनारन हिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून पुजाऱ्याचा शोध घेतला जात आहे. (Miss Grand Malaysia 2021, Lishalini Kanaran, alleges sexual assault by a priest during a temple visit in Sepang)
लिशालिनी कनारन मलेशियातील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. २०२१ मध्ये लिशालिनी कनारन हिने मिस ग्रँड मलेशियावर नाव कोरले होते. त्यानंतर चित्रपटातही तिने आपला ठसा उमटवलाय. २१ जून रोजी लिशालिनी हिच्यासोबत हे घाणेरडं कृत्य झाल्याचे इन्स्टाग्राम पोस्टवरून समजतेय. ही घटना समोर येताच मलेशियामध्ये खळबळ उडाली आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा घृणास्पद कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय. मलेशियन पोलिसांनी या प्रकरणाटा तपास सुरू केला आहे. फरार असणाऱ्या पुजाऱ्याचा शोध घेण्यासाठी मलेशिया पोलिसांकडून तीन ते चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
लिशालिनी हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला. २१ जून रोजी लिशालिनी एकटीच मंदिरात दर्शनासाठी गेली होती. लिशालिनी हिने मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी आरोपी पुजाऱ्याने तिला भारतातून आणलेलं पवित्र जल आणि रक्षा सूत्र देण्याच्या नावाखाली आशीर्वादासाठी बोलावले. प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर लिशालिनी हिला दीड तास थांबावे लागले होते. पुजाऱ्याने मंदिरातील खासगी कार्यालयात तिला बोलवलं.
लिशालिनी हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, पुजाऱ्याने एक द्रव पवित्र जलात मिसळलं आणि ते चेहऱ्यावर आणि शरीरावर शिंपडलं. हा द्रव इतका तीव्र होता की, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना जळजळ झाली आणि त्या डोळे उघडू शकल्या नाहीत. याच संधीचा गैरफायदा घेत पुजाऱ्याने पंजाबी सूट उचलण्यास सांगितले. लिशालिनीने नकार दिला. तेव्हा पुजाऱ्याने संतापून कपड्यावरून टीका केली. त्यानंतर, पुजारी मागे उभा राहिला आणि कथितपणे प्रार्थना म्हणत असताना ब्लाऊज आणि अंतर्वस्त्रांमध्ये हात घालून घाणेरडं कृत्य केलं. त्याने सांगितले की, त्याच्यासोबत 'ते' केले तर तो आशीर्वाद ठरेल, कारण तो देवाची सेवा करतो, असे त्याने सांगितलं.
पुजाऱ्याच्या या कृत्याने लिशालिनीला मानसिक धक्का बसला. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हे सर्व चुकीचे असल्याचे मला समजत होते. पण मी हालचाल कुरू शकते नव्हते, काही बोलूही शकले नाही. मला अजूनही समजत नाही की मी का प्रतिकार करू शकले नाही.
या धक्कादायक घटनेनंतर लिशालिनी अजूनही स्वतला सावरू शकल्या नाहीत. ४ जुलै रोजी तिने आपल्यासोबत घडेलली घडना आईला सांगितली. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. मंदिरात पोलिस पोहचले होते, पण तो आधीच फरार झाला होता, असेही लिशालिनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.
लिशालिनी हिने पोलिस तपास अधिकाऱ्याकडूनही दबाव आल्याचा आरोप केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर एका अधिकाऱ्याने याबाबत सोशल मीडियावर बोलू नये, अन्यथा त्यांनाच दोषी ठरवले जाईल, अशी धमकी दिली होती. यामुळे संतप्त झालेल्या लिशालिनी हिने आपला अनुभव सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, मी हे स्वतःला पीडित म्हणून दाखवण्यासाठी लिहित नाहीये. तर अशा अनुभवातून गेलेल्या प्रत्येकाला आपला दोष नसल्याचे समजावे म्हणून लिहित आहे. तुम्ही काहीही चुकीचे केले नाही. आणि जर तुम्हाला कोणाची गरज असेल, तर मी इथे आहे. तुम्ही एकटे नाही. दरम्यान, मलेशियन पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीरपणे घेतले आहे. संशयिताला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.