Pune-Nashik Expressway: गुड न्यूज! आता पुणे-नाशिक फक्त ३ तासात, सरकारचा २८४२९ कोटींचा प्लान, वाचा कसा असेल नवा हायवे?

Pune-Nashik highway plan : पुणे-नाशिक एक्सप्रेसवेमुळे प्रवासाचा वेळ ५ तासांवरून ३ तासांवर येणार आहे. १३३ किमी लांबीचा हा महामार्ग विकासाला चालना देणार आहे.
Pune-Nashik Industrial Expressway
Pune-Nashik Industrial Expressway Maharashtra govt Mega Highway Plan Cut Travel Time to 3 Hours need to know all aboutSaam TV News Marathi
Published On

Pune Nashik Industrial Expressway Project : पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक हे तीन जिल्हे आणखी जवळ येणार आहेत. कारण जिल्ह्यांना जोडणारा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. पुणे-नाशिक हायवेचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या हायवेमुळे पुणे आणि नाशिक या शहरातील अंतर तब्बल दोन तासांनी कमी होणार आहे. पुण्याहून नाशिकला फक्त तीन तासांत (Pune to Nashik in 3 Hours) पोहचता येणार आहे. या एक्सप्रेस वेसाठी २८४२९ कोटींचं बजेट असणार आहे. पुणे आणि नाशिक या दोन शहरांमध्ये १३४ किमी लांबीचा एक्सप्रेस वे बांधण्यात येणार आहे.

पुणे आणि नाशिक औद्योगिक एक्सप्रेस वे कधीपर्यंत तयार होणार?

पुणे आणि नाशिक औद्योगिक एक्सप्रेस वेची लांबी १३३ किमी इतकी आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. या हायवेसाठी १५४५ हेक्टर जमिनीचे अधिगृहण करावे लागेल. हा एक्सप्रेस वे पुण्यातील खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातून जाणार आहे. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातून नाशिकला पोहचणार आहे. या हायवेमुळे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील पर्यटन आणि विकासाला मोठी चालना मिळेल.

पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे मार्गाला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. जर औद्योगिक महामार्गाला चालना दिली गेली तर पुणे आणि नाशिकमधील अंतर पाच तासांवरून तीन तासांपर्यंत कमी होईल. त्यामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे.

Pune-Nashik Industrial Expressway
Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

पुणे-नाशिक औद्योगिक एक्सप्रेस वे कसा असेल?

पुणे नाशिक औद्योगिक एक्सप्रेसवेवर १२ मोठे फ्लायओव्हर ब्रीज असतील. हे ब्रिज नदी अन् नाल्याच्या वरून असतील. पुणे जिल्ह्यातील चाकण, बापल, चिंबली या ठिकाणी नऊ ब्रिज असतील. अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये राजुरी, खंडारमल, सकुर, माची, कसारेमध्ये इंटरचेंज असतील. एक्सप्रेस वेवर जाण्यासाठी आणि बाहेर निघण्यासाठी इंटरचेंजचा वापर होईल. हा हायवे शिर्डीला जाणाऱ्या हायवेलाही जाण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितलेय.

Pune-Nashik Industrial Expressway
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला जाताना अपघात, कार ३०० फूट दरीत कोसळली

पुणे-नाशिक हायवेला खर्च किती होणार ?

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गासाठी सरकारने आधीच सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती रस्ते विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर यांनी दिली. त्यानुसार १३३ किलोमीटर लांबीच्या या नव्या द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी अंदाजे २८,४२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचे पुढील काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

Pune-Nashik Industrial Expressway
Tukdebandi Kayda : आता १ गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

पुणे-नाशिक हायवेला सरकारकडून गेल्यावर्षी मंजूरी

राज्य सरकारकडून फेब्रुवारी २०२४ मध्ये पुणे-नाशिक हायवेच्या डिझाईनला मंजुरी दिली होती. हा हायवे सूरत-चेन्नई हायवेला जोडला जाणार आहे. त्यामुळे या हायवेचा इतर राज्यातील नागरिकांनाही फायदा होणार आहे. या महामार्गाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) आणि फीजिबिलिटी स्टडी रिपोर्ट (व्यवहार्यता अभ्यास अहवाल) तयार झाला आहे. हा प्रस्ताव काही दिवसांत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला जाणार आहे.

Pune-Nashik Industrial Expressway
खुशखबर! पुण्याला १२ नव्या मेट्रो मिळणार, जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com