Air India Plane Crashed: "आपणच क्रॅश केलं एअर इंडियाचं विमान..!; प्रियकराला अडकवण्यासाठी तरुणीनं रचला कट

Air India Plane Crashed: एका मुलीने वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्या होत्या.
Air India Plane
Air India Plane Crashedsaam Tv
Published On

प्रेमात अपयश आल्यानंतर अनेकजण मनात राग धरत नकार देणाऱ्यांना धडा शिकवतात. असाच प्रकार चेन्नईच्या रेने जोशिल्दा हिने केलाय. प्रेमात नकार मिळाल्यानंतर प्रियकराला धडा शिकवण्यासाठी रेने नावाच्या मुलीने एअर इंडियाचं विमान क्रॅश केलं. विमान क्रॅश केल्याचा ईमेल तिने आपल्या प्रियकराच्या नावाने केला होता.

एअर इंडिया अपघातानंतर सापडलेल्या ब्लॅक बॉक्सच्या तपासणीशी संबंधित माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शेअर केली आहे. ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं सत्य बाहेर येणार आहे. मात्र तपास अधिकारी या अपघाताचा चौकशी चहु बाजुंनी केली जात आहे. सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. या तपासात तपास यंत्रणेला एअर इंडिया क्रॅश केल्याचा एक मेल मिळाला. या मेलमुळे दिल्लीसह 12 राज्यांचे पोलीस, गुप्तचर संस्था आणि शेकडो सुरक्षा कर्मचारी कामाला लागले आहेत.

Air India Plane
अरं देवा! चक्क मुख्यमंत्र्यांनाच फसवलं; ताफ्यातील १९ गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरलं

तपासाअंती वेगळेच सत्य बाहेर आले. चेन्नईच्या रेने नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक करण्यात आलीय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमसह १२ राज्यांमध्ये २१ हून अधिकवेळा, बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्या याबत पोलिसांनी रेने जोशिल्दा या तरुणीला अटक केलीय. याच तरुणीने आपल्या मित्राच्या नावाने खोटा इमेल करत एअर इंडियाबाबत धमकी दिली होती.

नेमकं प्रकरण नेमकं काय?

ही तरुणी रोबोटिक्समध्ये प्रशिक्षित अभियंता आहे आणि चेन्नईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर काम करते. एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर तिने तिच्या 'प्रियकर'ला अडकवण्यासाठी, त्याच्या नावाने एक ईमेल करून आपणच हे विमान पाडले,असं सांगितलं होतं. रेने तिचा सहकारी असलेल्या दिविज प्रभाकरच्या एकतर्फी प्रेमात पडली. मात्र फेब्रुवारी महिन्यात प्रभाकरने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. रेनेला याचा राग आला.

याचा बदला घेण्यासाठी तिने प्रभाकरच्या नावाने अनेक ईमेल आयडी तयार केले. त्यात तिने बॉम्बसंदर्भात खोटी माहिती असलेले ईमेल पाठवण्यास सुरुवात केली. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कुशल असल्याने तिने पोलिसांपासून वाचण्यासाठी डार्क वेब आणि व्हर्च्युअल आयडीचा वापर केला.

अपघातानंतर केला मेसेज

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,अहमदाबाद विमान अपघातानंतर, रेनेने बी. जे. मेडिकल कॉलेजला ई-मेल पाठवला होता. तुम्हाला ताकद समजली असेलच. काल मेल केला होता. आज इअर इंडियाचं विमान क्रॅश करवण्यात आले.पोलिसांनी बनावट धमकी समजून याकडे दुर्लक्ष केले असेल. शाब्बास पायलट. आता आपल्याला समजले असेल, आम्ही खेळत नव्हतो, असा मेल तिने केला होता. रेनेने ई-मेल आयडीवरून दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये बॉम्बचे खोटे इ-मेल पाठवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com