Pune Vande Bharat Express, Train List, Timetable, Routes : पुणेकरांच्या सेवेत लवकरच चार नवीन वंदे भारत येणार आहेत. त्यामुळे पुणे स्थानकातून सुटणाऱ्या वंदे भारतची संख्या सहा इतकी होईल. सध्या पुण्यातून कोल्हापूर आणि हुबळीसाठी वंदे भारत धावत आहेत. मुंबईप्रमाणाचे पुण्यातही मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे. देशभरातली कानाकोपऱ्यातून लोक पुण्यामध्ये येतात. पुण्यातून प्रवास करणाऱ्यांची क्षमता पाहता रेल्वेकडून चार नवीन वंदे भारत (Indian Railways confirms 4 new Vande Bharat Express trains from Pune) सुरू करण्यात येणार आहे. रेल्वेकडून पुण्यातून चार नवीन वंदे भारत सुरू होणार असल्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली होती. पुण्यातून कोणत्या शहरांसाठी वंदे भारत सुरू होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...(Full route of upcoming Vande Bharat trains from Pune)
पुण्यातून आणखी चार नवीन वंदे भारत सुरू होणार असल्याची घोषणा २८ डिसेंबर २०२४ मध्ये रेल्वेकडून घोषणा करण्यात आली होती. सध्या पुण्यातून दोन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. यामध्ये आणखी भर पडणार आहे. पुणे-शेगाव, पुणे वडोदरा, पुणे सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या चार मारगावर वंदे भारत धावणार आहेत. पुण्यातून शेगाव, गुजरात, सिकंदराबाद आणि बेळगावला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रेल्वेकडून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय पुणे-नागपूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू कऱण्याचा विचार रेल्वेकडून कऱण्यात येतोय. वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचा वेळ तर वाचणार आहेच, त्याशिवाय आरामदायी प्रवास करता येणार आहे.
पुणे - शेगाव वंदे भारत एक्सप्रेस कुठे थांबणार, तिकिट किती असणार, याबाबात रेल्वेकडून अद्याप कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. या मार्गावर वंदे भारत कोण कोणत्या स्थानकावर थांबणार, ती संभाव्य स्थानकांची माहिती समोर आलेली आहे. दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या स्थानकावर वंदे भारत थांबू शकते. पुणे - शेगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही
पुणे, लोणावळा, पनवेल, वापी, सूरत, वडोदरा या मार्गावर पुणे-वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस थांबू शकते. सध्याच्या ट्रेनच्या तुलनेत (सुमारे 9 तास) वंदे भारतमुळे हा वेळ 6-7 तासांपर्यंत कमी होऊ शकतो.
पुणे, दौंड, सोलापूर, गुलबर्गा, सिकंदराबाद या स्थानकावर ही वंदे भारत एक्सप्रेस थांबू शकते. या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ दोन ते तीन तास वाचू शकतो.
पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव या स्थानकवर वंदे भारत एक्सप्रेस थांबण्याची शक्यता आहे. तिकिटाचे दर अंदाजे १५०० ते २००० रूपये इतके असू शकतात. तसेच प्रवासाचा वेळ दोन ते तीन तासांनी कमी होऊ शकते. पुणे-बेळगाव ही वंदे भारत ट्रेन पुणे-हुबळी वंदे भारतच्या पर्यायी दिवशी चालवली जाऊ शकते, किंवा विस्तार केला जाऊ शकतो.
How will Pune Vande Bharat expansion impact local travel?
पुण्यातून शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव या चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांना फायदा होणार आहेच. त्याशिवाय येथील विकासालाही नवीन चालना मिळू शकते. शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव येथे जलद आणि अधिक आरामदायी प्रवास करता येणार आहे. या मार्गांमुळे जोडलेल्या क्षेत्रांमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे, कारण पर्यटकांसाठी आरामदायी आणि कार्यक्षम प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.