
Investment Tips in Marathi : प्रत्येकजण भविष्यासाठी पैशांची सेव्हिंग करत असतो. एफडी, आरडी, म्युचल फंड, सोनं, घर, पीपीएफसह विविध गोष्टींमध्ये भविष्यासाठी गुंतवणूक केली जाते. पण त्यासाठी मोठी रक्कम गुंतवली जाते. पण एका छोट्या गुंतवणुकीतूनही कोट्यधीश होण्याचा मार्ग सापडलाय. होय, फक्त एक कप कॉफीच्या पैशातून १० वर्षांत एक कोटी इतके रूपयांची सेव्हिंग होऊ शकते. गुंतवणूक सल्लागार जुगल कागटाडा यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट करत याबाबतचा दावा केलाय. एक कप कॉफी सोडल्याने दहा वर्षांत एक कोटींची संपत्ती जमा करता येऊ शकते, असा दावा त्यांनी केलाय. (How much SIP is required monthly to save ₹1 crore in 10 years?)
सुरुवातीला सेव्हिंगची सवय लागायला थोडे अवघड जाईल, मात्र सेव्हिंग करण्यासाठी सवय होणे गरजेचे आहे. यामुळे महिन्यात थोडी सेव्हिंग होऊ शकेल. मध्यमवर्गीय, सामान्य कमाई करणाऱ्यांनीही नियमितपणे गुंतवणूक करण्याची शिस्त लावून घेतल्यास कोट्यधीश होता येऊ शकते. महिन्याला छोटी गुंतवणूक करण्याची सवय लागायला हवी, असा दावा केलाय वाचूयात नेमकं काय सांगितलेय...
जुगल कागटाडा यांनी वर्षाला १२ % परतावा गृहीत धरून सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे विविध मासिक गुंतवणूक करण्याचा प्लॅन सांगितलाय. त्यानुसार, २५,१५ आणि १० वर्षे गुंतवणूक करावी लागेल. वाचा...
महिन्याला ५ हजार रूपयांची २५ वर्षे गुंतवणूक केल्यास एक कोटींची संपत्ती होईल.
१५ हजार रूपये महिन्याला गुंतवल्यास १५ वर्षांत एक कोटी रूपयांची संपत्ती होईल.
महिन्याला २१ हजार रूपये गुंतवल्यास १० वर्षांमध्ये एक कोटी रूपयांची संपत्ती होईल.
उदाहरणार्थ, महिन्याला ५ हजार रूपये म्हणजेच, प्रत्येक दिवसाला १६६ रूपये गुंतवणूक करावी लागेल. ही रक्कम दररोजच्या जेवणाच्या डिलिव्हरीच्या खर्चाएवढी आहे. मोठी संपत्ती जमावण्यासाठी संयम आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक करणं गरजेच आहे. त्यामध्ये चक्रवाढ व्याजाचा (compounding) प्रभाव महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. Can daily ₹166 investment make you rich?
मोठी संपत्ती मिळवण्यासाठी अचानक मिळणारा नफा किंवा जोखमीच्या निर्णय महत्त्वाचा नाही. तर सातत्यपूर्ण गुंतवणूक आहे. चक्रवाढ व्याजामुळे संपत्ती लवकर जमवता येते. चक्रवाढ व्याजामध्ये गुंतवणुकीवरील परतावा कालांतराने अतिरिक्त परतावा मिळतो. अनेकजण श्रीमंत होण्यात अपयशी ठरतात, कारण त्यांच्याकडे उत्पन्नाची कमतरता असते असे नाही. ते अपयशी ठरतात कारण त्यांच्याकडे योजना, प्लानिंग नसते. तर कधीकधी संयमही नसतो, असे कागटाडा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.
SIP मध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करा. मार्गेटमध्ये होणाऱ्या चढ-उताराकडे दुर्लक्ष करा. नफा-तोटा याच सुरूवातीला कोणताही विचार करू नका. फक्त एसआयपी सुरू करा अन् ती नियमीत चालूच राहू द्या. शेअर बाजारात घसरण होत असेल तरीही गुंतवणूक थांबवू नका. शिस्तबद्ध गुंतवणूकदारांना अस्थिरतेचा फायदा होऊ शकतो. कमी किंमती म्हणजे तुम्हाला तितक्याच पैशात जास्त युनिट्स मिळतात. अशा प्रकारे तुम्ही सेव्हिंग मोठ्या प्रमाणात होऊ शकते, असेही कागटाडा यांनी सांगितलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.